Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

७६ लाख मतवाढीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणार!

mosami kewat by mosami kewat
October 23, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
७६ लाख मतवाढीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणार!
       

२८ ऑक्टोबरला मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मुंबईत मोर्चा – ॲड. प्रकाश आंबेडकर

अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणूक आयोगाने चालवलेल्या घोटाळ्याविरोधात महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्यापासून लढा सुरू करण्यात आला आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ७५ लाख वाढलेल्या मतदानाचा डेटा देण्यात यावा, या मागणीपासून या लढ्याची सुरुवात झाल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

येत्या २८ ऑक्टोबर रोजी या घोटाळ्याच्या विरोधात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे.

नवीन मतदारांसाठी असलेला फॉर्म क्रमांक ६ मतदार यादीतून चुकीने वगळण्यात आलेल्या नागरिकांनाही भरायला सांगितला जात असल्याचा आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते म्हणाले की, यापूर्वी मतदार असलेल्या व्यक्तीचे नाव चुकीने वगळले गेले असेल, तर ते नाव पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी स्वतंत्र कायदेशीर तरतूद नसल्याने निवडणूक आयोगाने फॉर्म क्रमांक ६ मध्ये बदल केला आहे.

या फॉर्मसोबत संबंधित व्यक्तीला प्रतिज्ञापत्र द्यावे लागत असून, त्यात यापूर्वी मतदार नसल्याचे नमूद करावे लागत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. यापूर्वी मतदार असलेल्या व्यक्तीने असे प्रतिज्ञापत्र दिल्यास खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचा आरोप होऊन संबंधित व्यक्तीवर फौजदारी कारवाई होऊ शकते, असे ॲड. प्रकाश आंबेडकर बोलले. निवडणूक आयोग नागरिकांना अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र देण्यास भाग पाडत असल्याचा आरोप करत, या प्रक्रियेला त्यांनी विरोध दर्शविला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रपतींनी परवानगी द्यावी, अशी मागणी २८ ऑक्टोबरच्या मोर्चाद्वारे करण्यात येणार असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

नागरिकांना गुन्हेगार ठरविण्याची परिस्थिती निर्माण करणाऱ्या प्रक्रियेविरोधात हा मोर्चा असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात आवाज उठविण्यासाठी आणि महाराष्ट्रातील ७६ लाख मतदारांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, आमचा हा मोर्चा काँग्रेस पक्षासारखा राहणार नाही की, ज्याच्यामध्ये राजकीय पक्षांना बोलवायचंच नाही, पण नंतर आरोप करायचा की त्यांनी आम्हाला मदतच केली नाही. किंवा या आंदोलनामार्फत काँग्रेस जे एस्टॅब्लिश करायला मागतं, ते म्हणजे आम्हाला ओबीसी, दलित, आदिवासींच्या नेत्यांची गरज नाही. त्यांनी आमच्या पाठीमागे फरफटत यावं. भारतीय जनता पक्षाची मुसलमानांच्या संदर्भात जी भूमिका आहे ती त्यांनी वापरली आहे. 

तसेच आम्ही या २८ तारखेच्या मोर्च्यामध्ये डावे, समाजवादी पक्ष, विद्यार्थी संघटना, आदिवासी संघटना यांना निमंत्रण देण्यात आले आहे. आपण या २८ तारखेच्या मोर्च्यामध्ये सहभागी होऊन इलेक्शन कमिशन जे इथल्या भारतीय नागरिकांना गुन्हेगारी करण्यास प्रवृत्त करतंय किंवा गुन्हेगार करतंय, त्याच्या विरोधातला हा मोर्चा आहे असे देखील ते म्हणाले. 

मोर्च्याची सुरुवात २८ ऑक्टोबर रोजी भायखळा येथील राजमाता जिजाऊ उद्यान ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत असेल. या मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ७६ लाख मतदारांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणार असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेला राज्याचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, राज्याचे नेते जितरत्न पटाईत, अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, मिलिंद इंगळे उपस्थित होते.

 


       
Tags: AkolaElection commissionPrakash AmbedkarVanchit Bahujan Aghadi
Previous Post

धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !धम्मचक्र प्रवर्तन दिन ही केवळ धार्मिक घटना नसून अन्यायाविरुद्ध दिलेले आव्हान – अंजलीताई आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
७६ लाख मतवाढीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणार!
बातमी

७६ लाख मतवाढीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणार!

by mosami kewat
October 23, 2026
0

२८ ऑक्टोबरला मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मुंबईत मोर्चा – ॲड. प्रकाश आंबेडकर अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणूक आयोगाने चालवलेल्या...

Read moreDetails
धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !धम्मचक्र प्रवर्तन दिन ही केवळ धार्मिक घटना नसून अन्यायाविरुद्ध दिलेले आव्हान – अंजलीताई आंबेडकर

धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !धम्मचक्र प्रवर्तन दिन ही केवळ धार्मिक घटना नसून अन्यायाविरुद्ध दिलेले आव्हान – अंजलीताई आंबेडकर

October 22, 2026
साहिल वाकोडे प्रकरणावरून सुजात आंबेडकरांचा प्रस्थापितांवर हल्लाबोल; म्हणाले, आंबेडकरी चळवळच आपल्या पाठीशी उभी राहते

साहिल वाकोडे प्रकरणावरून सुजात आंबेडकरांचा प्रस्थापितांवर हल्लाबोल; म्हणाले, आंबेडकरी चळवळच आपल्या पाठीशी उभी राहते

October 22, 2026
अकोल्यातील धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !

अकोल्यातील धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !

October 22, 2026
हातरुण दुर्घटना : धम्मचक्र प्रवर्तन दिन रॅलीत विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू, सहा जण जखमी; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून कुटुंबाचे सांत्वन

हातरुण दुर्घटना : धम्मचक्र प्रवर्तन दिन रॅलीत विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू, सहा जण जखमी; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून कुटुंबाचे सांत्वन

October 20, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home