Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

साहिल वाकोडे प्रकरणावरून सुजात आंबेडकरांचा प्रस्थापितांवर हल्लाबोल; म्हणाले, आंबेडकरी चळवळच आपल्या पाठीशी उभी राहते

mosami kewat by mosami kewat
October 22, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
साहिल वाकोडे प्रकरणावरून सुजात आंबेडकरांचा प्रस्थापितांवर हल्लाबोल; म्हणाले, आंबेडकरी चळवळच आपल्या पाठीशी उभी राहते
       

अकोला : “आयआयटी मुंबईमध्ये शिक्षण घेणाऱ्या साहिल वाकोडे यांच्यावर महाविद्यालय प्रशासनाने कॉपी केल्याचा आरोप केला. मात्र, हा आरोप सिद्ध झाला नाही आणि त्यांच्यावर योग्य तपासही झाला नाही. तरीही संपूर्ण व्यवस्था साहिल वाकोडे यांना दोषी ठरवत होती. साहिल वाकोडे यांच्या आई-वडिलांनी मुंबईतील आझाद मैदानावर महिनाभरापासून उपोषण करूनही त्यांना न्याय मिळालेला नाही,” असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले.

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव–२०२६ निमित्त अकोला येथे भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यासाठी राज्याच्या विविध भागांतून लाखो बौद्ध अनुयायी दाखल झाले होते. अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानावर अनुयायांचा अभूतपूर्व जनसागर उसळला होता. या वेळी लाखोंच्या जनसमुदायाला संबोधित करताना सुजात आंबेडकर यांनी साहिल वाकोडे प्रकरण, आरक्षणविरोधी आंदोलने, जातीय भेदभाव आणि आंबेडकरवादी चळवळीच्या भूमिकेवर भाष्य केले.

सुजात आंबेडकर म्हणाले की, जातीय व्यवस्था, जातीय हिंसाचार आणि संस्थात्मक हत्यांमुळे जीव गमावलेल्या रोहित वेमुला, पायल तडवी, विराज जगताप, नितीन आगे, सागर शेजवळ, अक्षय भालेराव, नितीन बनसोड आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्यासारख्या तरुणांच्या यादीत आता साहिल वाकोडे यांचे नाव जोडले गेले आहे. वर्धा जिल्ह्यातील बौद्ध कुटुंबातून आलेल्या साहिल वाकोडे यांनी स्पर्धा परीक्षेत जिल्ह्यात अव्वल स्थान मिळवले होते. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला होता, याची आठवण त्यांनी करून दिली.

साहिल वाकोडे यांच्या प्रकरणावर बोलताना सुजात आंबेडकर यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या आंदोलनाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, साहिल यांच्या आई-वडिलांनी आझाद मैदानावर उपोषण सुरू केले असताना त्याच परिसरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे बंधूचे मोर्चे निघाले; मात्र या पक्षांपैकी एकही नेता साहिल यांच्या आई-वडिलांना भेटायला गेला नाही. “या महाराष्ट्रात एकच असा नेता आहे, जो साहिल वाकोडे यांच्या आई-वडिलांना आझाद मैदानावर जाऊन भेटला, त्यांच्या तंबूखाली बसला, त्यांचे प्रश्न समजून घेतले आणि त्यांच्या वकिलांना पुढील खटल्याबाबत मार्गदर्शन केले. त्या नेत्याचे नाव ॲड. बाळासाहेब आंबेडकर आहे,” असे ते म्हणाले.

आरक्षणविरोधी आंदोलनांवर टीका करताना सुजात आंबेडकर म्हणाले की, जेन जीच्या आंदोलनानंतर देशात मोठ्या प्रमाणावर आरक्षणविरोधी वातावरण निर्माण झाले. आरक्षणाचा लाभ घेणारे विद्यार्थी आणि आंबेडकरवादी समाजाला सोशल मीडिया, प्रसारमाध्यमे तसेच प्रत्यक्षात जातिवाचक शिवीगाळ आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आरक्षणाच्या विरोधात आंदोलने सुरू असताना प्रस्थापित राजकीय पक्षांनी आंबेडकरवादी समाजाच्या बाजूने ठोस भूमिका घेतली नाही.

“जेव्हा आरक्षणावर हल्ला होतो, तेव्हा आपल्यासाठी कोणी उभे राहत नाही. आपल्यासाठी फक्त आणि फक्त आंबेडकर चळवळच उभी राहते, हे आपल्या सर्वांना समजून घ्यायला हवे,” असे ते म्हणाले.

तरुणांच्या राजकीय सहभागाचे स्वागत करताना त्यांनी स्पष्ट केले की, देशातील तरुणांनी रस्त्यावर उतरून आपली राजकीय भूमिका मांडणे, न्याय, हक्क आणि अधिकारांसाठी आंदोलन करणे ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, तरुण पिढीने जातीयवाद आणि आरक्षणविरोधी विचारसरणीपासून सावध राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

जेन जीचा उल्लेख करताना सुजात आंबेडकर म्हणाले की, हा केवळ एक वयोगट आहे. या गटात हिंदुत्ववादी, डावे, समाजवादी, पुरोगामी आणि आंबेडकरवादी विचारांचे तरुण आहेत. आज सोशल मीडियावर आरक्षणाच्या मुद्द्यावरून जातिवाचक शिवीगाळ करणारेही तरुणच आहेत. त्यामुळे पुढील पिढीला कोणते विचार दिले जातात, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.

“आमची पिढी शहाणी होणार आहे. माझी जनरेशन बदल घडवणार आहे. आम्ही युवक आंबेडकरी चळवळीला पुढे घेऊन जाणार आहोत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन बाळासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील स्वाभिमानी चळवळ महाराष्ट्रात आणि भारतात उभी केल्याशिवाय राहणार नाही,”असा निर्धारही सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केला.

आंबेडकरवादी, दलित, बहुजन आणि आदिवासी तरुणांचे खच्चीकरण करण्यासाठी व्यवस्था कार्यरत असल्याचा आरोप करत ते म्हणाले की, शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी घराबाहेर पडणाऱ्या तरुणांना ते हुशार नाहीत, त्यांच्यात क्षमता नाही आणि आरक्षणामुळेच ते पुढे आले आहेत, असे वारंवार सांगून त्यांच्यात न्यूनगंड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.

“आज तुम्ही यांची बरोबरी कराल आणि यांची जागा घ्याल, याची त्यांना भीती वाटते. म्हणून तुमचे खच्चीकरण करण्यासाठी संपूर्ण व्यवस्था उभी केली जाते,” असे सांगत त्यांनी तरुणांनी आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे आवाहन केले.

मेळाव्याच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात उत्साह आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. ‘उसळलेल्या जनसागराचे एकच नेते, ॲड. बाळासाहेब आंबेडकर’ अशा घोषणांनी संपूर्ण अकोला शहर दुमदुमून गेले. अनुयायांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मैदानावर झालेली प्रचंड गर्दी यामुळे यंदाच्या अकोला धम्म मेळाव्याने लक्ष वेधून घेतले.


       
Tags: AkolaAkola Dhamma MelavaBhartiy Bauddh MahasabhaMaharashtraPoliticalSujat AmbedkarVanchit Bahujan Aghadi
Previous Post

अकोल्यातील धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साहिल वाकोडे प्रकरणावरून सुजात आंबेडकरांचा प्रस्थापितांवर हल्लाबोल; म्हणाले, आंबेडकरी चळवळच आपल्या पाठीशी उभी राहते
बातमी

साहिल वाकोडे प्रकरणावरून सुजात आंबेडकरांचा प्रस्थापितांवर हल्लाबोल; म्हणाले, आंबेडकरी चळवळच आपल्या पाठीशी उभी राहते

by mosami kewat
October 22, 2026
0

अकोला : "आयआयटी मुंबईमध्ये शिक्षण घेणाऱ्या साहिल वाकोडे यांच्यावर महाविद्यालय प्रशासनाने कॉपी केल्याचा आरोप केला. मात्र, हा आरोप सिद्ध झाला...

Read moreDetails
अकोल्यातील धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !

अकोल्यातील धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !

October 22, 2026
हातरुण दुर्घटना : धम्मचक्र प्रवर्तन दिन रॅलीत विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू, सहा जण जखमी; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून कुटुंबाचे सांत्वन

हातरुण दुर्घटना : धम्मचक्र प्रवर्तन दिन रॅलीत विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू, सहा जण जखमी; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून कुटुंबाचे सांत्वन

October 20, 2026
केवळ उत्सव नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचा आविष्कार : ॲड. प्रकाश आंबेडकर 

केवळ उत्सव नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचा आविष्कार : ॲड. प्रकाश आंबेडकर 

October 20, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात; मुख्यमंत्र्यांनी तरी दिवाळी साजरी करावी!

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात; मुख्यमंत्र्यांनी तरी दिवाळी साजरी करावी!

October 20, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home