Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

भूमिगत गटार कामाची नगरसेवक सचिन गायकवाड यांच्याकडून पाहणी; दर्जेदार कामासह रस्ते पूर्ववत करण्याच्या सूचना

mosami kewat by mosami kewat
June 24, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
भूमिगत गटार कामाची नगरसेवक सचिन गायकवाड यांच्याकडून पाहणी; दर्जेदार कामासह रस्ते पूर्ववत करण्याच्या सूचना
       
लातूर : लातूर मध्ये प्रभागातील भूमिगत गटार वाहिनीचे काम दर्जेदार पद्धतीने आणि वेळेत पूर्ण व्हावे, तसेच नागरिकांना कोणत्याही समस्येचे सामना करावे लागू नये यासाठी वंचित बहुजन आघाडीचे लातूर महानगरपालिकेचे नगरसेवक सचिन गायकवाड यांनी संबंधित अधिकारी, अभियंते आणि कंत्राटदारांसह कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.

प्रभागातील आरोग्यविषयक समस्या दूर करण्यासाठी आणि सांडपाणी व्यवस्थापन सुधारण्यासाठी भूमिगत गटार वाहिनीचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी काम सुरू असलेल्या विविध ठिकाणांना भेट देऊन कामाच्या गुणवत्तेची तपासणी केली.

यावेळी त्यांनी गटार वाहिनीसाठी वापरण्यात येणारे साहित्य व पाईप्स उच्च दर्जाचे असावेत, अशा स्पष्ट सूचना संबंधितांना दिल्या. तसेच कामादरम्यान नागरिकांना होणारी गैरसोय कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

तसेच काम सुरू असलेल्या ठिकाणी योग्य बॅरिकेडिंग, सुरक्षेची व्यवस्था आणि वाहतुकीचे नियोजन करण्यात यावे, अशी सूचना कंत्राटदाराला करण्यात आली. भूमिगत गटार वाहिनीचे काम निर्धारित मुदतीत पूर्ण करून खोदलेले रस्ते तातडीने पूर्ववत करण्यासाठी कामाचा वेग वाढवण्याचे निर्देशही देण्यात आले.

यावेळी सचिन गायकवाड यांनी सांगितले की, भूमिगत गटार वाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील सांडपाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असून प्रभागाच्या विकासाला चालना मिळणार आहे.

Tags: laturLatur municipal corporationMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

नांदेड विधान परिषद निवडणुकीतील मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; प्रशांत इंगोले यांची निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी

Next Post

शॉर्ट्सच्या युगात हरवत चाललेला सखोल विचार?

Next Post
शॉर्ट्सच्या युगात हरवत चाललेला सखोल विचार?

शॉर्ट्सच्या युगात हरवत चाललेला सखोल विचार?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!
बातमी

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

by mosami kewat
October 3, 2026
0

पुणे : वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश कमिटी आणि ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक आज पुणे येथे पार पडली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष...

Read moreDetails
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026
तरुणांचा राग रस्त्यावर का?

तरुणांचा राग रस्त्यावर का?

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home