Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नांदेड विधान परिषद निवडणुकीतील मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; प्रशांत इंगोले यांची निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी

mosami kewat by mosami kewat
June 23, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
नांदेड विधान परिषद निवडणुकीतील मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; प्रशांत इंगोले यांची निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी
       
नांदेड : नांदेड जिल्हा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणूक २०२६ मधील मतदान प्रक्रियेबाबत गंभीर शंका उपस्थित करत उमेदवार इंजि. प्रशांत विराज इंगोले यांनी भारत निवडणूक आयोगाकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे. निवडणुकीतील काही मतपत्रिकांवर उमेदवारांसमोर करण्यात आलेल्या खुणांच्या वैधतेबाबत स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

इंगोले यांनी भारत निवडणूक आयोगाचे आयुक्त, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी, नांदेडचे जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक निरीक्षक यांना पाठविलेल्या निवेदनात मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

निवेदनात, मतदानासाठी देण्यात आलेल्या अधिकृत सूचनांमध्ये मतदारांनी उमेदवारांसमोर पसंतीक्रम म्हणून “1” किंवा रोमन अंक “I” लिहिण्याची तरतूद होती. मात्र मतदानानंतर अनेक मतदारांनी उमेदवारांसमोर केवळ साधी उभी रेघ मारल्याची चर्चा विविध स्तरांवरून समोर येत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

यामुळे अशा खुणांना वैध मत म्हणून स्वीकारताना कोणते निकष लावण्यात आले, मतदाराचा हेतू कसा निश्चित करण्यात आला, सर्व मतपत्रिकांवर समान निकष लागू करण्यात आले का आणि अशा मतांची संख्या निकालावर परिणाम करणारी होती का, असे अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचे इंगोले यांनी म्हटले आहे.

लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदानाची गुप्तता जितकी महत्त्वाची आहे, तितकेच मतमोजणीचे निकष स्पष्ट, पारदर्शक आणि सर्वांसाठी समान असणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्रपणे पडताळणी करून मतपत्रिकांवरील खुणांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तपासणीत कोणतीही विसंगती अथवा नियमांच्या अंमलबजावणीत तफावत आढळून आल्यास निवडणूक कायद्यानुसार योग्य ती पुढील कार्यवाही करण्यात यावी, अशीही मागणी इंगोले यांनी निवेदनाद्वारे केली आहे. लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम राखण्यासाठी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याचे आवाहन त्यांनी निवडणूक आयोगाला केले आहे.

Tags: ElectionMaharashtranandedNanded MLC ElectionNanded MLC Poll VotingPolitical
Previous Post

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाचा विकास करावा – निलेश देव

Next Post

भूमिगत गटार कामाची नगरसेवक सचिन गायकवाड यांच्याकडून पाहणी; दर्जेदार कामासह रस्ते पूर्ववत करण्याच्या सूचना

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home