Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाचा विकास करावा – निलेश देव

mosami kewat by mosami kewat
June 23, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाचा विकास करावा – निलेश देव
       
अकोला : आज अकोला महानगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेदरम्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाच्या सर्वांगीण विकासाचा विषय उपस्थित करण्यात आला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे गटनेते तथा नगरसेवक निलेश देव यांनी सभागृहात ठामपणे भूमिका मांडत सांगितले की, महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभा दिनांक १९ ऑगस्ट २०१६ मध्ये सदर खुले नाट्यगृहाच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाकडे १० कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव पाठविण्याचा विषय मंजूर करण्यात आला होता. मात्र अद्यापही या विषयावर अपेक्षित कार्यवाही झालेली दिसून येत नाही.

निलेश देव यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले की, महाराष्ट्र राज्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेले हे एकमेव खुले नाट्यगृह असून त्याचे जतन, संवर्धन व आधुनिक पद्धतीने विकास होणे ही सामाजिक व ऐतिहासिक जबाबदारी आहे.

सदर नाट्यगृहाचा विकास झाल्यास सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच विविध जनजागृती कार्यक्रमांना मोठे व्यासपीठ उपलब्ध होईल. तसेच शहराच्या सांस्कृतिक ओळखीतही भर पडेल.

याकरिता पूर्वी सभागृहात सादर करण्यात आलेला प्रस्ताव मंजुरीसाठी तातडीने पुढे पाठवून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत प्राधान्यक्रमाने निधी उपलब्ध करून विकासकाम हाती घ्यावे, अशी मागणी निलेश देव यांनी सभागृहात रेटून धरली.

Tags: AkolaDr Babasaheb AmbedkarDr Babasaheb Ambedkar theatreMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

माजी सरपंच धर्मेंद्र जाधव यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

Next Post

नांदेड विधान परिषद निवडणुकीतील मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; प्रशांत इंगोले यांची निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!
बातमी

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

by mosami kewat
October 3, 2026
0

पुणे : वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश कमिटी आणि ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक आज पुणे येथे पार पडली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष...

Read moreDetails
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026
तरुणांचा राग रस्त्यावर का?

तरुणांचा राग रस्त्यावर का?

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home