Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अकोल्यातील धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !

mosami kewat by mosami kewat
October 22, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
अकोल्यातील धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !
       

ॲड. प्रकाश आंबेडकर : दिवाळीआधी सरकारने मदतीची आकडेवारी जाहीर करावी

अकोला : गेली 42 वर्ष अखंडपणे चालू असलेल्या अकोल्यातील धम्म मेळाव्याल लाखोंचा जनसागर उसळला. उपस्थित जनसमुदायाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी संबोधित करत देशातील राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि दुष्काळी परिस्थितीवर भाष्य केले.

ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सरकार कुंभमेळ्यातील लोकांची सोय करताय, हे ठीक आहे पण, दुष्काळात मरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काय करताय? हे आधी सांगा. केंद्र सरकार महाराष्ट्राकडून हजारो कोटींचे टॅक्स घेते पण, दुष्काळात काहीच मदत नाही. सरकारने दिवाळीआधी मदतीची आकडेवारी जाहीर करावी. सरकारच्या तिजोरीत पैसे नसतील तर भाजप-आरएसएसच्या कार्यकर्त्यांकडे, नेत्यांकडे प्रचंड पैसा आहे, त्यांना आता धरावे लागेल. लोकांनी यांच्या घरा पुढे जावे आणि जेवण, पाणी मागावे.

शेतकऱ्यांना आवाहन आहे की, सरकारने दिवाळीपर्यंत नुसते 5 हजार नाही तर शेतात जे नुकसान झाले आहे. त्याचा योग्य मोबदला देणार नसेल तर शेतकऱ्यांनी भाजपचा जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार यांच्या घरासमोर रांग लावायची आणि पाणी, जेवण मागायचे. दुष्काळाचे संकट मोठे आहे. पाणी जपून वापरा. सगळे सोंग करता येईल पण, पाण्याचे सोंग घेता येणार नाही. दुष्काळ हाताबाहेर जाणार नाही याचा विचार सरकारने करावा. मुख्यमंत्री बांधावर गेले पण, काहीच केले नाही. सोयाबीन संपले. कापूस कमी झाला. जगण्याचे साधन राहिले नाही. म्हणून सरकारने दुष्काळाच्या उपाययोजना काय केल्या? हे मुख्यमंत्री फडणवीसने सांगावे.

सम्राट अशोकाने कलिंगच्या युद्धानंतर बुद्धाचा मार्ग स्वीकारणारा दिवस आहे. समता आणि व्यक्ती स्वातंत्र्य हा रुजवण्याचा मार्ग आहे. हाच मार्ग बाबासाहेबांनी १९५७ साली स्वीकारला. नाकारलेल्या वर्गाला मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, यासाठी बौद्ध धम्म स्वीकारला. जात नावाची जी व्यवस्था आहे. जिने या देशाला गुलाम केले. दुसऱ्याचे मांडलिक झाले आणि या देशाला स्वतःचे एक अस्तित्व असावे, एक चेहरा, एक ओळख असावा, एक विचार असावा एक इतिहास असावा तो बुद्धाच्या मार्गाने निर्माण केला. ज्यामध्ये जातीअंताचा एक मार्ग आहे. असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

काँग्रेस अध्यक्षाच्या समाज माध्यमांमध्ये कुठेही अशोक विजयादशमी किंवा प्रवर्तन हा शब्दच दिसत नाही. इतिहासाचा कुठे उल्लेख नाही.  जात जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत या देशाचे स्वातंत्र्य कायम राहत नाही हे लक्षात घ्या. इथे द्वंद आहे, देशाच्या स्वातंत्र्याला महत्व द्यायचं की, जातीला महत्व द्यायचं. जातीच्या अस्तित्वाला महत्व द्यायचं, तर मग धर्माला महत्व द्या. असे म्हणत त्यांनी सामाजिक द्वंदवावर सडकून टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांनी त्यांचाही धम्म मेळाव्यातील भाषणात खरपूस समाचार घेतला. आंबेडकरांनी म्हटले की, अमेरिका तुमच्यावर गुलामी आणायला लागली आहे, आर्थिक निर्बंध आणायला लागली आहे. नाकेबंदी करायला लागली आहे. कारण इथली व्यवस्था आणि व्यवस्थेमधील माणूस हा आपला नाही. किंवा अमेरिका जे बोलत आहे ते चुकीचे आहे असेही बोलण्याचे त्याचे धाडस होत नाही.

काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना विचारतो की, बाबासाहेब आंबेडकरांनी जातीअंताचा लढा हा बुद्धाच्या मार्गातून गेला. हे कदाचित तुम्हाला मान्य नसेल, पण जे जे काँग्रेसचे पुरस्कर्ते आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे झालर घेतले आहे आणि काँग्रेसचा प्रचार करत आहेत त्या सगळ्यांना सांगायचं आहे की, काँग्रेस पक्षाला विचारा, जातीअंताचा लढा तुम्ही कुठल्या मार्गाने लढणार आहेत? याचा तरी खुलासा करा. असे म्हणत त्यांनी काँग्रेसची बाजू घेऊन स्वतःला आंबेडकरी म्हणणाऱ्या नेत्यांचा आणि बुद्धिजीवींना निशाण्यावर घेतले.

आरएसएसला जात अस्तित्व पाहिजे, त्यांना ती संपायला नको वाटते हे ते उघडपणे मान्य करतात. पण काँग्रेसवाल्यांनो हा तर खुलासा करा की, इथे जात संपवण्याचा तुमचा मार्ग काय ? कारण एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाही. जात आणि देश एका म्यानात राहू शकत नाही. बाबासाहेबांच्या नावाची ज्यांनी झालर घेतली आहे यांना विचारतो, न घर का ना घाट का धोबी का कुत्ता अशी तुमची अवस्था झाली आहे. ना धड तुम्हाला बाबासाहेबांचा जातीअंताचा मार्ग माहिती आहे आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसोबत जायला बघता त्या काँग्रेसकडे जातीअंताचाचं मार्ग नाही. आणि म्हणून बाबासाहेब नेहमी म्हणत होते की, ज्यांना व्यक्ती स्वातंत्र्याची आणि लोकशाहीची व्यवस्था करायची आहे त्यांना स्वतंत्र राजकारण केल्याशिवाय मार्ग नाही. दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी प्यायला गेलात तर तुम्हाला हे सोडावं लागेल. असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला.

आता आपण ठरवायचे आहे की, आपण आपले स्वतंत्र राजकारण उभे करणार की, दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणार.

सामाजिक लढ्याच्या प्रश्नांमध्ये काँग्रेस आणि आरएसएस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे लक्षात घ्या. त्यांना ही जातीव्यवस्था पाहिजेत, त्यांनाही सवर्णाचे वर्चस्व पाहिजे आणि शूद्र व अतिशुद्र त्यांच्या दावणीला बांधलेला पाहिजेत. आता तुम्हाला ठरवायचे आहे. बैलाला जसे दावणीला बांधले जाते आणि ठराविक वेळ त्याला सोडले जाते, ठराविक वेळ त्याला खायला दिले जाते त्याला स्वतःला स्वातंत्र्य नसते. आपण दावणीच्या बैलासारखे जगायचे की, स्वतंत्र जगायचं हे ठरवण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

बाबासाहेब नेहमी म्हणाले की, या जगात आणि युगात क्रांती आणि प्रतिक्रांतीचा लढा आजही सुरू आहे. युगात लढे बदलत गेले. आजच्या युगात व्यक्ती स्वातंत्र्य जिवंत आहे हे कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमाने दाखवावे लागते. ते मतांच्या माध्यमातून दाखवता येते की मी स्वतंत्र आहे, मी माझा मालक आहे. हे व्यक्त कशातून होते तर ते मतातून होते. या युगात व्यक्ती स्वातंत्र्याचे साधन मताचे साधन आहे आणि आज या मतदानावर घाला घातला जात असल्याची खंत त्यांनी बोलताना व्यक्त केली.

ज्ञानेश कुमार वर जो आरोप केला जात आहे तो यामुळे की, तो आपले व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेत आहे आणि म्हणून त्या विरोधात लढा दिला पाहिजे हे लक्षात घ्या. काँग्रेस पक्षाला खऱ्या अर्थाने लढायच असत, तर त्या जंतरमंतर वरती तुम्ही ज्ञानेश कुमारला जोपर्यंत काढत नाही तो पर्यंत आम्ही ठिय्या करतो आम्ही उठतच नाही. २०१२ मध्ये टू जी प्रकरणने काँग्रेसला नाकीनऊ आणले होते तेच काँग्रेसने केले असते, तर या आरएसएस आणि भाजपच्या नाकीनऊ आले असते. पण त्यांना नौटंकी करायची होती ती नौटंकी झाली. असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या लढ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

SIR च्या माध्यमातून 2 कोटी मतदार महाराष्ट्रमधून डिलीट केले जातील. हे सर्वात आधी आम्हीच सांगितले आणि तेच महाराष्ट्रात घडले. याबाबत स्पष्टीकरण दिले. लढा हा साध्य होत नाही तोपर्यंत लढलं पाहिजे. अर्धवट सोडून चालत नाही. हा लढा जिवंत राहिला पाहिजे. यासाठी २८ तारखेला मुंबई मध्ये आपण ज्ञानेश कुमार हटवा या आंदोलनाची त्यांनी घोषणा केली.

मल्लिकार्जुन खरगे यांच्याबाबत झालेल्या जातीयवादावर सुद्धा ॲड. आंबेडकरांनी निशाणा साधला. आंबेडकरांनी म्हटले की, आज जे लोकं म्हणत आहेत की, माझी आर्थिक परिस्थिती बदलली मला कसलीच गरज नाही. मी त्यांना सांगतो की, तुमच्या श्रीमंतीपेक्षा खर्गेंची संपत्ती हजार पटीने जास्त आहे. तुमच्याकडे १० कोटी असतील तर त्याच्याकडे १ हजार कोटी आहेत. पण त्याचे हजारो कोटी त्याची इज्जत वाचवू शकले नाहीत. ज्या मंदिरात तो गेला, त्याचे पुन्हा शुद्धीकरण करण्यात आले. खरगेंना जो संदेश द्यायचा होता आणि खरगेंच्या मार्फत आपल्याला जो संदेश द्यायचा होता तो देऊन मोकळा झाला. कुठे बदलली परिस्थिती ? असा सवालही उपस्थित केला.

काँग्रेसच्या ढोंगीपणावर बोलताना ॲड. आंबेडकर म्हणाले की, जो काँग्रेस पक्ष सेक्युलॅरिझमच्या गोष्टी करतो, समतेच्या गोष्टी करतोय. अरे नालायक काँग्रेसवाल्यांनो तुमच्या राष्ट्रीय अध्यक्षाची इभ्रत राखण्यासाठी तुम्ही एक मोर्चा तरी काढायला पाहिजे होता. जोपर्यंत खरगेंनी खंत व्यक्त केली नाही, तो पर्यंत तो पर्यंत काँग्रेसवाले बोलायला तयार नव्हते. हे काँग्रेसचे अंतरंग आहे हे लक्षात घ्या, असे म्हणते त्यांनी काँग्रेस, भाजपला फैलावर घेतले.

यावेळी मंचावर पक्षाचे राष्ट्रीय कार्यकरिणी सदस्य नतिकुद्दीन खतीब, सदस्या अरुंधती शिरसाट, प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे, भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र अध्यक्ष यू.जी. बोराडे, अंजलीताई आंबेडकर, युवा नेते सुजात आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी राज्य कमिटी सदस्य, भन्ते गण, कार्यक्रमाचे अध्यक्ष पी. जी. वानखेडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.


       
Tags: AkolaAnjali Tai Ambedkardhamma chakra pravartan dayDhamma MelavaFarmerMaharashtraPoliticalPrakash AmbedkarSujat AmbedkarVanchit Bahujan Aghadi
Previous Post

हातरुण दुर्घटना : धम्मचक्र प्रवर्तन दिन रॅलीत विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू, सहा जण जखमी; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून कुटुंबाचे सांत्वन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अकोल्यातील धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !
बातमी

अकोल्यातील धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !

by mosami kewat
October 22, 2026
0

ॲड. प्रकाश आंबेडकर : दिवाळीआधी सरकारने मदतीची आकडेवारी जाहीर करावी अकोला : गेली 42 वर्ष अखंडपणे चालू असलेल्या अकोल्यातील धम्म...

Read moreDetails
हातरुण दुर्घटना : धम्मचक्र प्रवर्तन दिन रॅलीत विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू, सहा जण जखमी; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून कुटुंबाचे सांत्वन

हातरुण दुर्घटना : धम्मचक्र प्रवर्तन दिन रॅलीत विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू, सहा जण जखमी; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून कुटुंबाचे सांत्वन

October 20, 2026
केवळ उत्सव नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचा आविष्कार : ॲड. प्रकाश आंबेडकर 

केवळ उत्सव नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचा आविष्कार : ॲड. प्रकाश आंबेडकर 

October 20, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात; मुख्यमंत्र्यांनी तरी दिवाळी साजरी करावी!

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात; मुख्यमंत्र्यांनी तरी दिवाळी साजरी करावी!

October 20, 2026
सिंचन, वृक्ष लागवड, भूजल संवर्धन, पाणी पुरवठा योजनांमधील भ्रष्टाचारामुळे राज्यात अभूतपूर्व दुष्काळ – राजेंद्र पातोडे

सिंचन, वृक्ष लागवड, भूजल संवर्धन, पाणी पुरवठा योजनांमधील भ्रष्टाचारामुळे राज्यात अभूतपूर्व दुष्काळ – राजेंद्र पातोडे

October 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home