Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मुस्लिम बांधवांच्या दफनभूमीच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; आयुक्तांना दिले निवेदन

mosami kewat by mosami kewat
June 24, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मुस्लिम बांधवांच्या दफनभूमीच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; आयुक्तांना दिले निवेदन

मुस्लिम बांधवांच्या दफनभूमीच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; आयुक्तांना दिले निवेदन

उल्हासनगर : मुस्लिम समाजाच्या हक्कांसाठी आणि न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने भूमिका घेणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने उल्हासनगरमधील मुस्लिम बांधवांच्या दफनभूमीच्या प्रश्नावर पुन्हा एकदा आवाज उठवला आहे. मंजूर करण्यात आलेली दफनभूमीची जागा तातडीने उपलब्ध करून द्यावी किंवा त्याऐवजी पर्यायी जागा देण्यात यावी, या मागणीचे निवेदन आज पक्षाच्यावतीने ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज पवार यांनी महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले.

Also Read : भूमिगत गटार कामाची नगरसेवक सचिन गायकवाड यांच्याकडून पाहणी; दर्जेदार कामासह रस्ते पूर्ववत करण्याच्या सूचना

मोहरमच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, सामाजिक सलोखा कायम राहावा आणि कोणताही तणाव निर्माण होऊ नये, यासाठी वंचित बहुजन आघाडीने संयमाची भूमिका घेतली असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, मुस्लिम बांधवांच्या दफनभूमीच्या हक्काचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याने तो तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. (Muslim Burial Ground)

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मुस्लिम समाजासाठी मंजूर असलेली दफनभूमीची जागा त्वरित हस्तांतरित करावी. तसे शक्य नसल्यास समाजाच्या गरजा लक्षात घेऊन योग्य पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. हा प्रश्न केवळ सुविधेचा नसून धार्मिक आणि मानवी हक्कांशी संबंधित असल्याचेही निवेदनात अधोरेखित करण्यात आले. (Muslim Burial Ground)

Also Read : नांदेड विधान परिषद निवडणुकीतील मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; प्रशांत इंगोले यांची निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी

यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. मुस्लिम बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी पक्षाचा लढा पुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Tags: MaharashtraMuharramMuslim Burial GroundPoliticalUlhasnagarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

शॉर्ट्सच्या युगात हरवत चाललेला सखोल विचार?

Next Post

शहीद सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची राज्य मानवी हक्क आयोगात सुनावणी; पुढील सुनावणी १ जुलै रोजी

Next Post
शहीद सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची राज्य मानवी हक्क आयोगात सुनावणी; पुढील सुनावणी १ जुलै रोजी

शहीद सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची राज्य मानवी हक्क आयोगात सुनावणी; पुढील सुनावणी १ जुलै रोजी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home