Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आंबेडकरी कार्यकर्ता आपली मते प्रभावीपणे मांडू शकतो ; सुजात आंबेडकरांचा आरक्षण आणि मेरिटवर बोट ठेवणाऱ्यांवर निशाणा 

mosami kewat by mosami kewat
August 3, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
आंबेडकरी कार्यकर्ता आपली मते प्रभावीपणे मांडू शकतो ; सुजात आंबेडकरांचा आरक्षण आणि मेरिटवर बोट ठेवणाऱ्यांवर निशाणा 
       
मुंबई : अमित ठाकरेपेक्षा आमच्या आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ता प्रभावीपणे आपली मते मांडू शकतो आणि मांडत आहे. फरक फक्त एवढाच आहे की, जरी या मुलांकडे खूप जास्त टॅलेंट, क्षमता आणि मेरिट असलं तरी मीडिया स्पेस काहीच लोकांसाठी ‘Reserved’ असते. असे म्हणत आरक्षण आणि मेरिटवर बोलणाऱ्यांना हे का दिसत नाही?  असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी ‘X’ पोस्टद्वारे केला आहे.

सुजात आंबेडकर म्हणाले की, मी कोणाची खिल्ली उडवत नाही पण, आज देशभरात आरक्षण आणि मेरिट या मुद्द्यावर बोलले जात आहे. त्यामुळे अमित ठाकरे यांच्या भाषणावर बोलावसे वाटते. आंबेडकरवादी चळवळीतून व्याख्याने ऐकणारा, चळवळीचे कार्यक्रम, उपक्रम आपल्या गाव-खेड्यात, गल्लीत राबवणारा एक कार्यकर्ता अगदी स्पष्टपणे, निर्भीडपणे, सामाजिक भान जपत अन्याय-अत्याचाराविरुद्ध आणि समाज परिवर्तनावर परखड मत मांडू शकतो.

बहुजनवादी, आदिवासी, कामगार, डाव्या चळवळीतील विद्यार्थी त्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडतात. आताच CJP च्या आंदोलनातील मुले अत्यंत प्रभावीपणे बोलताना, सरकारला जाब विचारताना दिसले. ही सर्व मुले अमित ठाकरे यांच्यापेक्षा अधिक प्रभावीपणे मुद्दे मांडताना दिसली आहेत. त्यांना कोणी लिहून देईल, मग ते बोलतील, मग ते मांडतील, अशी वेळ त्यांच्यावर कधीही येत नाही. प्रश्नांचे आकलन, मते निर्भीडपणे मांडण्याचा, व्यक्त होण्याचा अभ्यास चळवळीतील कार्यकर्त्यांना असल्याचेही सुजात आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

तथाकथित मेनस्ट्रीम मीडिया विसरलेली भाषणे, मांडता न आलेले मुद्दे कव्हर करणे आणि त्याला महत्त्व देण्याचे काम करतात. पण याच्यापेक्षा कित्येक पटीने सक्षम असलेल्या चळवळीतील आणि आंदोलनातील लोकांना दाखवण्याची हिंमत का करत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित करत त्यांच्या योग्यतेचे श्रेय त्यांना कधीच दिले जात नसल्याचेही सुजात आंबेडकर यांनी म्हटले.

Tags: Amit ThackerayDr Babasaheb AmbedkarmumbaiSujat AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

चीनच्या घुसखोरीवर आक्रमकपणा का नाही? अल्पवयीन मुलींवरील कारवाईवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल

Next Post

FSSAI चा डाबरला मोठा धक्का: 100% च्या दिशाभूल करणाऱ्या दाव्यांवर आक्षेप, उत्पादनांच्या विक्रीवर बंदी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home