Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते उत्तम शंकरराव आचार्य यांचे निधन; वंचित बहुजन आघाडीकडून श्रद्धांजली

mosami kewat by mosami kewat
June 17, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते उत्तम शंकरराव आचार्य यांचे निधन; वंचित बहुजन आघाडीकडून श्रद्धांजली
       
रेणापूर : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ आणि निष्ठावान कार्यकर्ते, भारिप बहुजन महासंघाचे रेणापूर तालुक्याचे पहिले अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे माजी कर्मचारी उत्तम शंकरराव आचार्य यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीवर शोककळा पसरली आहे.

उत्तम आचार्य हे ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू, प्रामाणिक आणि खंदे कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. १९९२ मध्ये रेणापूर तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर त्यांना भारिप बहुजन महासंघाच्या पहिल्या रेणापूर तालुका अध्यक्षपदाचा मान मिळाला होता. तसेच आंबेडकरी विचारधारा आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीप्रती त्यांची निष्ठा अतूट होती. त्यांनी पक्ष संघटना उभारण्यासाठी खेडोपाडी पायी फिरून जनजागृती केली.

घरातील सोने गहाण ठेवून तसेच नोकरीतील पगारातील मोठा हिस्सा चळवळीच्या कार्यासाठी खर्च केला. आचार्य यांनी समाजकारणाला प्राधान्य देत रेणापूर तालुक्यात आंबेडकरी विचार घराघरात पोहोचविण्यासाठी आयुष्य वेचले. आचार्य यांच्या प्रयत्नांमुळेच ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे पानगाव नगरीशी जवळचे संबंध निर्माण झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली अकोल्याचे पहिले आदिवासी आमदार भीमराव केराम यांच्या सत्काराचा भव्य कार्यक्रम पानगाव येथे ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. तसेच त्यांच्या नेतृत्वात रेणापूर तालुक्यात भारिप बहुजन महासंघाची मजबूत संघटनात्मक फळी उभी राहिली. 

त्यांनी घडवलेल्या कार्यकर्त्यांच्या बळावर आजही रेणापूर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांसाठी आणि सामाजिक न्यायाच्या लढ्यासाठी खंबीरपणे कार्यरत आहेत. उत्तम शंकरराव आचार्य यांच्या निधनाबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील एक समर्पित, निष्ठावान आणि संघर्षशील नेतृत्व हरपल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Tags: Ambedkar momentDr Babasaheb AmbedkarMaharashtraPoliticalPrakash AmbedkarRenapurUttam Shankarrao Acharya
Previous Post

‘M FILES’ मुळे ‘तो माणूस’ अमेरिकेच्या तालावर नाचत आहे ; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा कोणावर निशाणा ?

Next Post

पडेगाव येथील ‘कचरा डेपो’ हटविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; संतप्त कार्यकर्त्यांनी गेटला ठोकले कुलूप

Next Post
पडेगाव येथील 'कचरा डेपो' हटविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; संतप्त कार्यकर्त्यांनी गेटला ठोकले कुलूप

पडेगाव येथील 'कचरा डेपो' हटविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; संतप्त कार्यकर्त्यांनी गेटला ठोकले कुलूप

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दुष्काळाच्या नावावर सरकारला लागले भिकेचे डोहाळे, शेतकऱ्यांना मदतीचा आराखडा नाही, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मात्र डल्ला – राजेंद्र पातोडे 
बातमी

दुष्काळाच्या नावावर सरकारला लागले भिकेचे डोहाळे, शेतकऱ्यांना मदतीचा आराखडा नाही, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मात्र डल्ला – राजेंद्र पातोडे 

by mosami kewat
October 17, 2026
0

मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी राज्य सरकारने अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातून एक दिवसाचे वेतन कापण्याचे परिपत्रक काढले...

Read moreDetails
चलो अकोला! धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त अकोल्यात लाखांचा जनसागर उसळणार; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन

चलो अकोला! धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त अकोल्यात लाखांचा जनसागर उसळणार; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन

October 17, 2026
दलित आदिवासी वस्त्यांच्या पाणीप्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचा तोडगा, कृती आराखडा मधील कामे स्थगित करून निधी पाणीपुरवठ्यासाठी वळवा – राजेंद्र पातोडे 

दलित आदिवासी वस्त्यांच्या पाणीप्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचा तोडगा, कृती आराखडा मधील कामे स्थगित करून निधी पाणीपुरवठ्यासाठी वळवा – राजेंद्र पातोडे 

October 17, 2026
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी

October 16, 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

October 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home