Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

परंड्यात स्मार्ट मीटरविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जुने मीटर बसविण्याची मागणी

mosami kewat by mosami kewat
August 17, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
परंड्यात स्मार्ट मीटरविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जुने मीटर बसविण्याची मागणी
       
उस्मानाबाद : परंडा शहर व तालुक्यात वीज ग्राहकांच्या पूर्वपरवानगीशिवाय बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरविरोधात वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेत स्मार्ट मीटर तातडीने काढून त्याठिकाणी जुने मीटर किंवा साधे डिजिटल मीटर बसविण्यात यावेत, अशी मागणी एम.एस.ई.बी.चे अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने एम.एस.ई.बी. परंडा येथील उपकार्यकारी अभियंता एस. एस. पवार यांची भेट घेऊन ग्राहकांच्या समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी शहर व तालुक्यातील अनेक ग्राहकांना कोणतीही लेखी अथवा तोंडी पूर्वसूचना न देता सुरू स्थितीतील जुने मीटर काढून त्यांच्या जागी स्मार्ट मीटर बसविण्यात आल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.

स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांना पूर्वीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वीज बिले येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. काही ग्राहकांना पूर्वीच्या बिलाच्या तुलनेत तिप्पट-चौपट रकमेची बिले येत असल्याने ग्राहकांमध्ये आर्थिक अडचणी निर्माण झाल्याचा तसेच मीटरच्या अचूकतेबाबत संभ्रम असल्याचा दावा वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

Also Read : मालेगावात मुस्लिम समाजातील तरुणांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

ग्राहकांच्या परवानगीशिवाय बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर तातडीने काढून त्याठिकाणी जुने मीटर अथवा त्याच धर्तीवरील साधे डिजिटल मीटर बसविण्यात यावेत, अशी ठाम मागणी करण्यात आली. ग्राहकांचे आर्थिक व मानसिक नुकसान होत असल्याने प्रशासनाने या प्रश्नावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली.

या मागणीवर त्वरित कार्यवाही न झाल्यास सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या हितासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के, फुले-आंबेडकर विद्वत सभा राज्य समन्वयक प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे, मोहनदादा बनसोडे, मधुकर सुरवसे, तुकाराम चौतमहाल, रविंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

Tags: MaharashtraSmart MeterVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Aghadi Protests Smart Meters in Paranda
Previous Post

मालेगावात मुस्लिम समाजातील तरुणांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

Next Post

सत्ताधारी पक्ष आणि सत्ताधारी वर्ग यात फरक करण्याची गरज ; अशा काळात , ज्या काळात सत्ताधारी पक्ष बदलाचे पडघम वाजू लागले आहेत !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे भारतीय बौद्ध महासभेचा वर्षावास समारोप कार्यक्रम
बातमी

धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे भारतीय बौद्ध महासभेचा वर्षावास समारोप कार्यक्रम

by mosami kewat
September 6, 2026
0

पुणे : आगळंबे येथे सांचीच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे भारतीय बौद्ध महासभेच्या पुणे जिल्ह्यातील सर्व शाखांचा...

Read moreDetails
रस्त्याची ओळख घराच्या नावाने नव्हे, अधिकृत क्रमांकाने करा! मनमाड नगरपरिषदेकडे वंचित बहुजन आघाडीची मागणी

रस्त्याची ओळख घराच्या नावाने नव्हे, अधिकृत क्रमांकाने करा! मनमाड नगरपरिषदेकडे वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 6, 2026
तिवसा पंचायत समितीवर वंचित बहुजन आघाडीची धडक; ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा!

तिवसा पंचायत समितीवर वंचित बहुजन आघाडीची धडक; ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा!

September 6, 2026
दिवंगत नारायणराव जाधव यांच्या कुटुंबीयांची प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट

दिवंगत नारायणराव जाधव यांच्या कुटुंबीयांची प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट

September 6, 2026
चाँद तक पहुँचे, पर अमानवीय प्रथा ख़त्म नहीं कर पाए: प्रकाश आंबेडकर का तीखा तंज

चाँद तक पहुँचे, पर अमानवीय प्रथा ख़त्म नहीं कर पाए: प्रकाश आंबेडकर का तीखा तंज

September 6, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home