Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पडेगाव येथील ‘कचरा डेपो’ हटविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; संतप्त कार्यकर्त्यांनी गेटला ठोकले कुलूप

mosami kewat by mosami kewat
June 17, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पडेगाव येथील 'कचरा डेपो' हटविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; संतप्त कार्यकर्त्यांनी गेटला ठोकले कुलूप

पडेगाव येथील 'कचरा डेपो' हटविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; संतप्त कार्यकर्त्यांनी गेटला ठोकले कुलूप

       

औरंगाबाद : पडेगाव येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे परिसरात प्रदूषण पसरले आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यामुळे कचरा डेपो तात्काळ हटवावा, अशी मागणी करीत वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केले. यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी कचरा डेपोच्या गेटला कुलूप ठोकले.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहर उपाध्यक्ष मेघानंद जाधव आणि पश्चिमचे शहराध्यक्ष ॲड. पंकज बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली भीमनगर, भावसिंगपुरा, पडेगाव रोडवरील ग्लोरिया सिटी परिसरात कचरा डेपोसमोर (डंपिंग ग्राउंड) मंगळवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. (Padegaon Garbage Depot)

Also Read : ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते उत्तम शंकरराव आचार्य यांचे निधन; वंचित बहुजन आघाडीकडून श्रद्धांजली

दोन महिन्यासांपासून डंपिंग ग्राउंडला लागलेल्या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर विषारी धूर पसरला आहे. या धुरामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि रुग्णांना श्वसनाचा त्रास, दम्याचे झटके, डोळ्यांची जळजळ आणि विविध आरोग्य समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे कचरा डेपो हटवावा, अशी मागणी वंचितच्या वतीने करण्यात आली. ‘कचरा डेपो हटवा, नागरिकांचे आरोग्य वाचवा’ अशा घोषणाही देण्यात आल्या.

तसेच, मनपा घनकचरा विभागाचे नंदकिशोर भोंबे यांना तात्काळ घटनास्थळी बोलवावे आणि हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. महानगर पालिकेचे वरिष्ठ अधिकारी कोणीही आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी कचरा डेपोच्या गेटला आणि घंटागाडीच्या वाहन तळाला कुलूप ठोकून आपला संताप व्यक्त केला. (Padegaon Garbage Depot)

Also Read : ‘M FILES’ मुळे ‘तो माणूस’ अमेरिकेच्या तालावर नाचत आहे ; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा कोणावर निशाणा ?

पडेगाव येथील कचरा डेपो बंद केला नाही, तर यापेक्षा मोठे आंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा मेघानंद जाधव आणि पंकज बनसोडे यांनी दिला. यावेळी पश्चिमचे शहराध्यक्ष ॲड. पंकज बनसोडे, महिला जिल्हाध्यक्ष कोमल हिवराळे, भा. वि. गवई, प्रवीण जाधव, गोकुळ भुजबळ, सतीश म्हस्के, कडूबा तुपे, अर्जुन मगरे, विमलबाई जाधव, पंचशीला बचके, सोनू नितनवरे, वैभव नितनवरे आदी उपस्थित होते.


       
Tags: Air PollutionAurangabad newsClean EnvironmentDumping GroundEnvironmental PollutionGarbage DumpMaharashtra newsPadegaonPublic HealthVanchit Bahujan AghadiWaste Management
Previous Post

ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते उत्तम शंकरराव आचार्य यांचे निधन; वंचित बहुजन आघाडीकडून श्रद्धांजली

Next Post

शिक्षकांचे रिक्त पदे तत्काळ भरा ; वंचित बहुजन आघाडीची मागणी

Next Post
शिक्षकांचे रिक्त पदे तत्काळ भरा ; वंचित बहुजन आघाडीची मागणी

शिक्षकांचे रिक्त पदे तत्काळ भरा ; वंचित बहुजन आघाडीची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
विष्णुपुरी पुलालगतची संरक्षक भिंत कोसळल्याप्रकरणी वंचित बहुजन युवा आघाडीचे ‘काम बंद आंदोलन’
बातमी

विष्णुपुरी पुलालगतची संरक्षक भिंत कोसळल्याप्रकरणी वंचित बहुजन युवा आघाडीचे ‘काम बंद आंदोलन’

by mosami kewat
July 17, 2026
0

नांदेड : नांदेड येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील विष्णुपुरी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पुलालगतची संरक्षक भिंत कोसळल्याच्या घटनेची उच्चस्तरीय...

Read moreDetails
गंगापूर वाळू तस्कर हल्ला: वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी घेतली मातंग वस्तीतील पीडितांची भेट

गंगापूर वाळू तस्कर हल्ला: वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी घेतली मातंग वस्तीतील पीडितांची भेट

July 17, 2026
बाळासाहेब आंबेडकर का जंतर मंतर पहुँचना सिर्फ़ एक मुलाकात नहीं, संविधान की आवाज़ है! 

बाळासाहेब आंबेडकर का जंतर मंतर पहुँचना सिर्फ़ एक मुलाकात नहीं, संविधान की आवाज़ है! 

July 16, 2026
सोनम वांगचूक यांच्याशी संवाद साधणे ही भाजपची घटनात्मक जबाबदारी ; राहुल गांधींनी पाठिंबा द्यायला हवा होता - ॲड. प्रकाश आंबेडकर

सोनम वांगचूक यांच्याशी संवाद साधणे ही भाजपची घटनात्मक जबाबदारी ; राहुल गांधींनी पाठिंबा द्यायला हवा होता – ॲड. प्रकाश आंबेडकर

July 16, 2026
Breaking News : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट

Breaking News : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट

July 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home