जोरहाट (आसाम): भारतीय हवाई दलाच्या (IAF) एका ‘AN-32’ मालवाहू विमानाला शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. आसाममधील जोरहाट येथील हवाई दलाच्या तळावर उतरत (Landing) असताना हे विमान धावपट्टीवर कोसळले. हा अपघात इतका भीषण होता की विमानाचे थेट दोन तुकडे झाले आणि विमानाला तात्काळ मोठी आग लागली. या दुर्घटनेमुळे संरक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (AN-32 Crash)
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, AN-32 हे मालवाहू विमान जोरहाट तळावर लँडिंग करत असताना अचानक कोसळले. विमान जमिनीवर आदळताच त्याचे दोन तुकडे झाले आणि अपघात होताच घटनास्थळावरून आगीच्या ज्वाळा व धुराचे प्रचंड लोट निघू लागले. अपघात होताच हवाई दलाच्या बचाव पथकाने (Rescue Team) तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले. विमान अपघाताच्या वेळी त्यात नक्की किती सैनिक आणि कर्मचारी स्वार होते, याबाबत अद्याप अधिकृत आकडा समोर आलेला नाही.
Also Read : मुंबई पोर्ट प्राधिकरणाकडून इंदिरा नगर परिसर उजळला; वंचित बहुजन आघाडीचा पाठपुराव्याला यश
विमानाला लागलेल्या भीषण आगीमुळे विमानातील कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली की नाही, याबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी अंतर्गत तपास सुरू करण्यात आला आहे. विमानातील कर्मचाऱ्यांची सद्यस्थिती आणि जीवितहानीबाबतची अधिकृत माहिती मिळवणे सुरू आहे. (AN-32 Crash)
दुष्काळाच्या नावावर सरकारला लागले भिकेचे डोहाळे, शेतकऱ्यांना मदतीचा आराखडा नाही, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मात्र डल्ला – राजेंद्र पातोडे
मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी राज्य सरकारने अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातून एक दिवसाचे वेतन कापण्याचे परिपत्रक काढले...
Read moreDetails






