Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मुंबई पोर्ट प्राधिकरणाकडून इंदिरा नगर परिसर उजळला; वंचित बहुजन आघाडीचा पाठपुराव्याला यश

mosami kewat by mosami kewat
June 13, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मुंबई पोर्ट प्राधिकरणाकडून इंदिरा नगर परिसर उजळला; वंचित बहुजन आघाडीचा पाठपुराव्याला यश
       

मुंबई : शिवडी तालुक्यातील प्रभाग क्रमांक २०६ अंतर्गत इंदिरा नगर आणि रामगड परिसरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून अंधाराच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. या समस्येच्या निराकरणासाठी वंचित बहुजन आघाडी (शिवडी तालुका) यांच्या वतीने सातत्याने पत्रव्यवहार, पाठपुरावा आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेण्यात आले होते.

अखेर या प्रयत्नांना यश मिळाले असून मुंबई पोर्ट प्राधिकरणाने (Mumbai Port Authority) मे २०२६ मध्ये इंदिरा नगर परिसरात सुमारे ९० आधुनिक एलईडी दिव्यांचे खांब उभारून संपूर्ण परिसर प्रकाशमय केला आहे. या कामामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून परिसरातील सुरक्षितता वाढण्यास आणि नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास मदत झाली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी नागरिकांना ये-जा करताना होणाऱ्या अडचणी दूर झाल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. या लोकहिताच्या कामासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे अध्यक्ष, अधिकारी वर्ग तसेच मुख्य यांत्रिकी अभियंता काडेकुझी रमेश यांचे आभार मानले आहेत.

Also Read : सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा मंत्रालयावर  ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा; पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बळाचा वापर

या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख मार्गदर्शक तथा माजी मुंबई सहसचिव सुदेश गमरे, शिवडी तालुका समन्वयक विजय जैस्वार, माजी तालुका उपाध्यक्ष मोहम्मद सलीम खान, कार्यकर्त्या आशा कदम, विक्रम एस. कांबळे, विक्रम झाल्टे, सागर खैरे आणि विशाल इंगळे यांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच अर्जाची तयारी आणि पाठपुराव्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कार्यकर्त्यांच्या योगदानाचाही गौरव करण्यात आला.

दरम्यान, मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या हद्दीतील इतर अंधारग्रस्त वसाहतींमध्येही अशाच प्रकारे मोठ्या एलईडी दिव्यांचे खांब उभारण्यात यावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. यासंदर्भात मुंबई पोर्ट प्राधिकरणाने उर्वरित भागांमध्येही टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.


       
Tags: Led streetlightMaharashtramumbaiVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा मंत्रालयावर  ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा; पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बळाचा वापर

Next Post

बुद्धभूमी फाउंडेशनवरील कारवाईच्या निषेधार्थ पैठणमध्ये तीव्र निदर्शने

Next Post
बुद्धभूमी फाउंडेशनवरील कारवाईच्या निषेधार्थ पैठणमध्ये तीव्र निदर्शने

बुद्धभूमी फाउंडेशनवरील कारवाईच्या निषेधार्थ पैठणमध्ये तीव्र निदर्शने

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी
बातमी

‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी

by mosami kewat
September 23, 2026
0

मुंबई : साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणी न्याय मिळावा, तसेच या प्रकरणात संस्थात्मक जबाबदारी निश्चित करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन...

Read moreDetails
बिहारची ती घटना आणि ‘डब्ल्यूईएफ’चा अहवाल: एकाच नाण्याच्या दोन बाजू

बिहारची ती घटना आणि ‘डब्ल्यूईएफ’चा अहवाल: एकाच नाण्याच्या दोन बाजू

September 23, 2026
मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक; भारताची २८ वर्षांची प्रतीक्षा संपली

मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक; भारताची २८ वर्षांची प्रतीक्षा संपली

September 23, 2026
मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

September 23, 2026
पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

September 23, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home