Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा मंत्रालयावर  ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा; पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बळाचा वापर

mosami kewat by mosami kewat
June 12, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा मंत्रालयावर  ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा; पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बळाचा वापर
       
मुंबई : सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आज मुंबईत मंत्रालयावर धडक देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा’ दरम्यान मोठा तणाव निर्माण झाला. विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक मागण्या, नीट परीक्षा व्यवस्थेतील गैरव्यवहार आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनात करण्यात आली होती. मोर्चामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तसेच राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) रद्द करून सर्व राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांची जबाबदारी UPSC कडे सोपवण्यात यावी, अशी प्रमुख मागणीही आंदोलक विद्यार्थ्यांनी केली.

मोर्चा मंत्रालयाच्या दिशेने मार्गस्थ होत असताना पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांबाबत जोरदार घोषणाबाजी करत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना रोखले. यावेळी आंदोलनकर्त्यांना अडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला.

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते कमलेश उबाळे म्हणणे की, देशातील परीक्षा व्यवस्थेवर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण होत असून विविध परीक्षांमधील गैरव्यवहारांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू आहे. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, विश्वासार्हता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली.

यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेश प्रवक्ते प्रशांत बोराडे, कमलेश उबाळे, आनंदराज घाडगे, स्वप्नील जवळगेकर, रोहित डोळस, संघर्षा संखद, भूषण पाईकराव, वंचित बहुजन आघाडी मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे, सागर गवई, स्नेहल सोहनी यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: Dharmendra PradhanEducationMaharashtramumbaiNEETPoliticalprotestSamyak Vidyarthi AndolanVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

‘ अमेरिकेत तीन भारतीय मारले गेले, मोदी गप्प का? ‘ प्रकाश आंबेडकरांचा सवाल

Next Post

मुंबई पोर्ट प्राधिकरणाकडून इंदिरा नगर परिसर उजळला; वंचित बहुजन आघाडीचा पाठपुराव्याला यश

Next Post
मुंबई पोर्ट प्राधिकरणाकडून इंदिरा नगर परिसर उजळला; वंचित बहुजन आघाडीचा पाठपुराव्याला यश

मुंबई पोर्ट प्राधिकरणाकडून इंदिरा नगर परिसर उजळला; वंचित बहुजन आघाडीचा पाठपुराव्याला यश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home