Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

२ दिवसांत बस सुरू करा; अन्यथा PMGSY कार्यालयात विद्यार्थ्यांसह ठिय्या आंदोलन!

mosami kewat by mosami kewat
August 12, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
२ दिवसांत बस सुरू करा; अन्यथा PMGSY कार्यालयात विद्यार्थ्यांसह ठिय्या आंदोलन!
       

कळमनुरी : कळमनुरी तालुक्यातील शेणोडी–मोरघव्हाण रस्त्याचे काम गेल्या कित्येक दिवसांपासून रखडल्यामुळे मागील दोन महिन्यांपासून या मार्गावरील शालेय बस सेवा पूर्णपणे बंद आहे. याचा फटका परिसरातील चार-पाच गावांतील शालेय विद्यार्थ्यांना बसत असून, पावसाळ्यात त्यांना शिक्षणासाठी पायी किंवा महागड्या ऑटोने प्रवास करावा लागत आहे. या समस्येची गंभीर दखल घेत, “येत्या २ दिवसांत रस्त्याचे काम पूर्ण करून बससेवा सुरू करा; चालक नसेल तर आमदारांना बोलावून बस चालवायला सांगा, अन्यथा PMGSY कार्यालयात ठिय्या आंदोलन करू!” असा आक्रमक इशारा वंचित बहुजन युवा आघाडीने दिला आहे.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजने (PMGSY) अंतर्गत शेणोडी–मोरघव्हाण रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, संबंधित ठेकेदार आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे हे काम वेळेत पूर्ण झालेले नाही. रस्ता खराब असल्याने मागील दोन महिन्यांपासून एसटी महामंडळाने बससेवा बंद ठेवली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज पावसाळ्यात चिखल तुडवत पायी जावे लागत आहे किंवा आर्थिक भुर्दंड सहन करत ऑटोने प्रवास करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची मोठी हेळसांड होत असून त्यांच्या अभ्यासावरही याचा विपरीत परिणाम होत आहे.

आज समस्त शालेय विद्यार्थ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते राजू कांबळे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. राजू कांबळे यांनी त्वरित विद्यार्थ्यांसह एसटी महामंडळाच्या डेपो मॅनेजर यांच्या दालनात धडक दिली आणि बससेवा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी केली. “जर एसटीच्या चालकाला या रस्त्यावरून बस चालवायला जमत नसेल, तर कळमनुरीच्या आमदारांना बोलावून घ्या आणि त्यांना बस चालवायला सांगा,” असा टोलाही त्यांनी प्रशासनाला लगावला. त्यानंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या संबंधित अभियंत्यांशी चर्चा करून रस्त्याचे प्रलंबित काम दोन दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

“गेली दोन महिने विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड आम्ही सहन करणार नाही. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग अडवणारा कोणताही विलंब खपवून घेतला जाणार नाही. येत्या दोन दिवसांत रस्त्याचे काम पूर्ण करून बससेवा सुरू झाली नाही, तर सर्व शालेय विद्यार्थ्यांना सोबत घेऊन प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालय, हिंगोली येथे तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने राजू कांबळे यांनी दिला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते राजू कांबळे, युवा तालुका अध्यक्ष मोहम्मद अस्लम, युवा तालुका महासचिव दिनेश पाईकराव, सुशील वाढवे, समाधान पाईकराव यांच्यासह परिसरातील शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       
Tags: EducationKalamnuri Road DelayMaharashtraPoliticalschoolSt Bus service
Previous Post

भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिका जाहीर: अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार सामने, बांगलादेश दौरा रद्द होण्याची शक्यता

Next Post

शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी जखमी : दोषींवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची सोलापूर जिल्हा परिषदेकडे मागणी

Next Post
शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी जखमी : दोषींवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची सोलापूर जिल्हा परिषदेकडे मागणी

शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी जखमी : दोषींवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची सोलापूर जिल्हा परिषदेकडे मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!
बातमी

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

by mosami kewat
October 3, 2026
0

पुणे : वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश कमिटी आणि ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक आज पुणे येथे पार पडली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष...

Read moreDetails
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026
तरुणांचा राग रस्त्यावर का?

तरुणांचा राग रस्त्यावर का?

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home