Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी; २३ सप्टेंबरला IIT बॉम्बेच्या डीनना जाब विचारणार : सुजात आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
September 22, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी; २३ सप्टेंबरला IIT बॉम्बेच्या डीनना जाब विचारणार : सुजात आंबेडकर
       
मुंबई : IIT बॉम्बेशी संबंधित साहिल वाकोडे यांच्या मृत्यूच्या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी संस्थेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सुजात आंबेडकर यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे की, IIT बॉम्बे ही कोणतीही तपास यंत्रणा नाही. असे असतानाही कोणत्याही स्वतंत्र चौकशीपूर्वीच संस्थेकडून सार्वजनिक निवेदन जारी करून विद्यार्थ्याच्या मृत्यूचा कथित परीक्षेतील गैरप्रकाराशी संबंध जोडणे हे संस्थात्मकदृष्ट्या चुकीचे होते.

सुजात आंबेडकर यांनी म्हटले की, घाईघाईने आणि स्वतंत्र चौकशी न करताच तयार करण्यात आलेल्या अधिकृत कथनामुळे तथ्यांबाबत आधीच एक धारणा निर्माण होते आणि मृत विद्यार्थ्याच्या नावाला सार्वजनिक पातळीवर बदनाम होण्याचा धोका निर्माण होतो. संस्थेच्या निवेदनानंतर माध्यमे आणि सोशल मीडियातील काही घटकांनी त्यालाच अंतिम सत्य मानले; मात्र निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशीची मागणी मागे पडली.

साहिल वाकोडे यांच्या कुटुंबीयांकडून जातीय अपमानाबाबत करण्यात आलेल्या आरोपांचीही निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. हे आरोप चौकशीशिवाय फेटाळून न लावता संबंधित पुरावे आणि परिस्थितीची तपासणी केली पाहिजे, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.

याच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुजात आंबेडकर यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. उद्या २३ सप्टेंबर रोजी मुंबईतील IIT बॉम्बेला भेट देणार आहेत. २३ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता ते IIT मुंबईच्या डीन यांना जाब विचारणार आहेत.

साहिल वाकोडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतंत्र चौकशी, पुरावे सुरक्षित ठेवणे आणि संस्थात्मक उत्तरदायित्व आवश्यक असल्यावर सुजात आंबेडकर यांनी भर दिला आहे. चौकशीऐवजी परीक्षेतील कथित गैरप्रकाराच्या अटकळींना मुद्दा बनवणे किंवा आरक्षणाला या प्रकरणाचा मुख्य विषय बनवणे योग्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

Tags: IIT BombayMaharashtramumbaiPoliticalSujat AmbedkarVanchit Bahujan Aghadi
Previous Post

वाहतूक कोंडी आणि आपत्कालीन सेवांना अडथळा! परभणीतील मध्यवर्ती भागातील आठवडी बाजार हटवण्याची वंचितची मागणी

Next Post

पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

Next Post
पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home