Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वाहतूक कोंडी आणि आपत्कालीन सेवांना अडथळा! परभणीतील मध्यवर्ती भागातील आठवडी बाजार हटवण्याची वंचितची मागणी

mosami kewat by mosami kewat
September 22, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वाहतूक कोंडी आणि आपत्कालीन सेवांना अडथळा! परभणीतील मध्यवर्ती भागातील आठवडी बाजार हटवण्याची वंचितची मागणी
       

परभणी : शहराच्या मध्यवर्ती भागात दर शनिवारी भरणाऱ्या आठवडी बाजारामुळे वाहतूक कोंडी, शालेय विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय तसेच अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकांसारख्या आपत्कालीन सेवांना मोठा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे आठवडी बाजार हे तातडीने मोकळ्या व प्रशस्त जागेत स्थलांतरित करा अशी, मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संदीप खाडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी परभणी महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांना निवेदन सादर केले आहे.

परभणी शहरातील मध्यवर्ती भागात दर शनिवारी आठवडी बाजार भरतो. व्यापाऱ्यांची वाढती संख्या आणि नागरिकांची मोठी गर्दी पाहता सध्याची जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांना भाजीपाला, फळे, किराणा व इतर साहित्य मुख्य डांबरी रस्त्यावर मांडून व्यवसाय करावा लागत आहे. तसेच बाजाराच्या दिवशी या परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

आपना कॉर्नर ते जेल कॉर्नर, जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे जाणारा मुख्य मार्ग तसेच विद्यानगर ते नानल पेठ कॉर्नर मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यालगत बाजार भरत असल्याने शनिवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोठी गर्दी होते. व्यापाऱ्यांची दुकाने, ग्राहकांची गर्दी आणि रस्त्यावर अस्ताव्यस्त उभी राहणारी वाहने यामुळे मुख्य रस्त्याचा मोठा भाग व्यापला जातो. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या परिस्थितीतून नागरिक, व्यापारी व ग्राहकांमध्ये वादाचे प्रसंगही निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

बाजार परिसरातच महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे कार्यालय आणि जिल्हा शासकीय रुग्णालय आहे. त्यामुळे आग, अपघात किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाची वाहने आणि रुग्णवाहिकांना या मार्गावरून जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र आठवडी बाजारामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे आपत्कालीन वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. गंभीर रुग्णांना रुग्णालयात नेतानाही अडथळा निर्माण होऊ शकतो, अशी चिंता वंचित बहुजन आघाडीने व्यक्त केली आहे.

यासोबतच याच मुख्य मार्गावर बाल विद्यामंदिर शाळा आहे. शनिवारी शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत पालकांची वाहने, विद्यार्थ्यांची गर्दी आणि आठवडी बाजारातील नागरिकांची गर्दी एकाच ठिकाणी येत असल्याने शाळेच्या प्रवेशद्वारासमोर वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असून, त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. दरम्यान, व्यापाऱ्यांनाही पुरेशी, सुरक्षित आणि नियोजित जागा उपलब्ध नसल्याने त्यांना वाहतुकीच्या मार्गात व्यवसाय करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांसोबतच व्यापाऱ्यांचीही गैरसोय होत असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.

आठवडी बाजारासाठी खंडोबा बाजार मैदान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदान तसेच महानगरपालिकेच्या मालकीची इतर मोकळी मैदाने यांचा पर्यायी जागा म्हणून विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. नवीन ठिकाणी बाजार स्थलांतरित करताना व्यापाऱ्यांसाठी पाणी, प्रकाश व्यवस्था, स्वच्छतागृह आणि पार्किंगसह आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी संदीप खाडे यांनी केली आहे. नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था, शाळकरी विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आपत्कालीन सेवांचा सुरळीत मार्ग यांचा विचार करून प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


       
Tags: MaharashtraMarketparbhaniParbhani Weekly MarketPoliticalVanchit Bahujan Aghadi
Previous Post

पुणे विद्यापीठातील मेसच्या दरवाढीविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; दर कमी करण्याची मागणी

Next Post

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी; २३ सप्टेंबरला IIT बॉम्बेच्या डीनना जाब विचारणार : सुजात आंबेडकर

Next Post
साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी; २३ सप्टेंबरला IIT बॉम्बेच्या डीनना जाब विचारणार : सुजात आंबेडकर

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी; २३ सप्टेंबरला IIT बॉम्बेच्या डीनना जाब विचारणार : सुजात आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home