Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

दुष्काळाच्या नावावर सरकारला लागले भिकेचे डोहाळे, शेतकऱ्यांना मदतीचा आराखडा नाही, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मात्र डल्ला – राजेंद्र पातोडे 

mosami kewat by mosami kewat
October 17, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
दुष्काळाच्या नावावर सरकारला लागले भिकेचे डोहाळे, शेतकऱ्यांना मदतीचा आराखडा नाही, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मात्र डल्ला – राजेंद्र पातोडे 
       
मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी राज्य सरकारने अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातून एक दिवसाचे वेतन कापण्याचे परिपत्रक काढले आहे. हा दुष्काळ निवारणाचा कार्यक्रम नसून निधी गोळा करण्याची मोहीम आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.  

सामान्य प्रशासन विभागाच्या १६ ऑक्टोबरच्या परिपत्रकात शेतकऱ्यांना प्रत्यक्ष काय मदत मिळणार, किती रक्कम, कोणत्या निकषांवर आणि कधीपर्यंत, याचा एका शब्दानेही उल्लेख नाही. गोळा होणारा पैसा फक्त दुष्काळासाठीच वापरला जाईल याची हमीही नाही. स्वतःची तिजोरी रिकामी असल्याचे झाकण्यासाठी सरकार कर्मचाऱ्यांच्या खिशात हात घालत आहे.

परिपत्रकात “आवाहन” म्हटले असले तरी वेतन देयकातून कपात आपोआप होणार आहे. नकार द्यायचा असेल तर आस्थापना अधिकाऱ्यांमार्फत दोन दिवसांत हरकतपत्र द्यावे लागेल, यामुळे नकार देणाऱ्यांची नावे वरिष्ठांसमोर उघड होतील आणि त्यांना बदला किंवा नाराजीचा सामना करावा लागू शकतो. एका दिवसापेक्षा कमी रक्कम स्वीकारली जाणार नाही, कर्ज किंवा हप्ते असलेल्या आणि कमी वेतनाच्या कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही सवलत नाही, तसेच कंत्राटी व मानधनी कर्मचाऱ्यांबद्दल परिपत्रक मौन बाळगते. 

एका दिवसाच्या वेतनाची गणना अस्पष्ट असल्याने कार्यालयानुसार वेगळी रक्कम कापली जाईल. कर सवलतीचे अर्धसत्य सांगितले जात असून नवीन कर प्रणाली निवडलेल्यांना ही वजावट मिळत नाही, हे कर्मचाऱ्यांना सांगितलेले नाही. हजारो कर्मचाऱ्यांचे पॅन व आधार क्रमांक ई-मेलने पाठवण्यास सांगितले असून गोपनीयतेचे कोणतेही निर्देश नाहीत, तर जिल्हा स्तरावर रोख रक्कम आठवडे बँक खात्यात ठेवण्यास परवानगी देताना तपासणी किंवा दुहेरी स्वाक्षरीची अट नाही. विभागांना सात दिवसांची मुदत, पण पोचपावती देण्यासाठी निधी कक्षाला कालमर्यादा नाही. मंत्री, आमदार, खासदार यांनी स्वतः काय योगदान द्यावे याचा उल्लेखही नाही.

शेतकऱ्यांना तातडीची भरपाई, पीक नुकसानीचे पंचनामे, कर्जमाफी, चारा-पाणी व्यवस्था यावर सरकार काय करणार हे आधी जाहीर करावे. आराखडा नसताना कर्मचाऱ्यांच्या वेतनावर आधी बोजा टाकणे हे दुष्काळाच्या नावावर चाललेले राजकारण आहे. वंचित बहुजन आघाडीने हे परिपत्रक तातडीने मागे घ्यावे किंवा कपात पूर्णपणे ऐच्छिक करावी, आणि दुष्काळ मदतीचा सविस्तर कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.

Tags: MaharashtraPoliticalVanchit Bahujan Aghadi
Previous Post

चलो अकोला! धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त अकोल्यात लाखांचा जनसागर उसळणार; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन

Next Post

कोलकाता हादरले! चोरबागान दुर्गा पूजा मंडपात सप्तमीच्या संध्याकाळी चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भारत आणि अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका निकाल ! 
अर्थ विषयक

भारत आणि अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका निकाल ! 

by mosami kewat
November 6, 2026
0

- संजीव चांदोरकर  अमेरिकेतील राजकीय सत्तेचा लंबक डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून फक्त दोन वर्षात दुसऱ्या टोकाला डेमोक्रॅटिक पक्षाकडे सरकू लागला आहे. ...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही

वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही

November 5, 2026
यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

November 5, 2026
दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

November 5, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

November 5, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home