Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

कोलकाता हादरले! चोरबागान दुर्गा पूजा मंडपात सप्तमीच्या संध्याकाळी चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर

mosami kewat by mosami kewat
October 18, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
कोलकाता हादरले! चोरबागान दुर्गा पूजा मंडपात सप्तमीच्या संध्याकाळी चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर
       

कोलकाता: पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील मध्यवर्ती भागातील अतिशय प्रसिद्ध आणि गर्दीच्या चोरबागान सार्वजनिक दुर्गा पूजा मंडपात सप्तमीच्या संध्याकाळी एका दुर्दैवी दुर्घटनेत मोठी चेंगराचेंगरी झाली. या भीषण दुर्घटनेत १९ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय, २५ ते ३० भाविक गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ कोलकाता मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सप्तमीच्या दिवशी संध्याकाळी मंडपात हजारो भाविकांची अलोट गर्दी जमली होती. यादरम्यान अचानक मुसळधार पाऊस सुरू झाल्याने बाहेर उभे असलेले भाविक तात्काळ आसऱ्यासाठी मंडपाच्या दिशेने धावले. दुसरीकडे, आतील लोकांना बाहेर पडण्यास मार्ग मिळेनासा झाला आणि बाहेरील तुफान गर्दीने एकाच वेळी रेटारेटी केल्यामुळे तिथे प्रचंड गोंधळ उडाला. आणि तात्पुरत्या उभारलेल्या पायऱ्यांवरून लोक एकमेकांवर कोसळले. यातच मंडपाच्या लोखंडी संरचनेचा (Iron Structure) काही भाग कोसळल्यामुळे जीवितहानी अधिक झाली. अवघ्या ५ ते ७ मिनिटात हा थरार घडला.

पोलिसांची कारवाई आणि आयोजक फरार

कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७:४० वाजता मुसळधार पावसामुळे अचानक सर्व जण एकाच वेळी एक्झिट गेटच्या दिशेने धावले. क्षणार्धात गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने ही चेंगराचेंगरी झाली.

Also Read : दुष्काळाच्या नावावर सरकारला लागले भिकेचे डोहाळे, शेतकऱ्यांना मदतीचा आराखडा नाही, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मात्र डल्ला – राजेंद्र पातोडे 

तसेच दुर्घटना घडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ पावले उचलत संबंधित दुर्गा पूजा मंडप बंद केला आहे. मात्र, या दुर्दैवी घटनेनंतर पूजा कमिटीचे आयोजक घटनास्थळावरून फरार झाल्याचे समजते. सध्या सुरक्षेचा उपाय म्हणून भाविकांसाठी मंडपाचे सर्व गेट पूर्णपणे बंद करण्यात आले असून पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.


       
Tags: ChorbaganDurga puja pandalkolkataPuja pandal
Previous Post

दुष्काळाच्या नावावर सरकारला लागले भिकेचे डोहाळे, शेतकऱ्यांना मदतीचा आराखडा नाही, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मात्र डल्ला – राजेंद्र पातोडे 

Next Post

ग्वाल्हेरमध्ये भीषण अपघात!  ट्रकच्या धडकेत १४ भाविक ठार, २९ जण जखमी

Next Post
ग्वाल्हेरमध्ये भीषण अपघात!  ट्रकच्या धडकेत १४ भाविक ठार, २९ जण जखमी

ग्वाल्हेरमध्ये भीषण अपघात!  ट्रकच्या धडकेत १४ भाविक ठार, २९ जण जखमी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दुष्काळग्रस्त शेतकरी आणि कष्टकऱ्यांसोबत वंचित बहुजन आघाडी साजरी करणार ‘काळी दिवाळी’; ८ नोव्हेंबरला राज्यभर आंदोलन
Uncategorized

दुष्काळग्रस्त शेतकरी आणि कष्टकऱ्यांसोबत वंचित बहुजन आघाडी साजरी करणार ‘काळी दिवाळी’; ८ नोव्हेंबरला राज्यभर आंदोलन

by Akash Shelar
November 7, 2026
0

पुणे : राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी वर्गाप्रती सरकारने दाखवलेल्या असंवेदनशीलतेचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या...

Read moreDetails
भारत आणि अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका निकाल ! 

भारत आणि अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका निकाल ! 

November 6, 2026
वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही

वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही

November 5, 2026
यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

November 5, 2026
दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

November 5, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home