Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ग्वाल्हेरमध्ये भीषण अपघात!  ट्रकच्या धडकेत १४ भाविक ठार, २९ जण जखमी

mosami kewat by mosami kewat
October 18, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
ग्वाल्हेरमध्ये भीषण अपघात!  ट्रकच्या धडकेत १४ भाविक ठार, २९ जण जखमी
       
ग्वाल्हेर: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे नवरात्रीच्या निमित्ताने शीतला माता मंदिरात दर्शनासाठी भाविक जात असताना धान्याने भरलेल्या एका भरधाव ट्रकने नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील दुकाने आणि भाविकांना धडक दिली. त्यानंतर ट्रक थेट मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आदळला. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली असून या भीषण दुर्घटनेत १४ भाविकांचा मृत्यू झाला. तसेच २९ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छिनोरकडून शीतला माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीव्र उतार आहे. नवरात्रीमुळे मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. रविवारी मध्यरात्री सुमारे दीडच्या सुमारास धान्याने भरलेला ट्रक या मार्गावर आला. पोलिसांनी तपासणी नाक्यावर ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र चालकाने बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. तीव्र उतारावर ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने वाहन अनियंत्रित झाले आणि त्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या पूजा साहित्याच्या दुकानांसह दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना धडक दिली.

अनियंत्रित ट्रक मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि संरक्षक भिंतीवर जोरात आदळला. या धडकेमुळे मंदिराची मोठी भिंत कोसळली. यामुळे अनेक नागरिक ट्रकखाली आणि ढिगाऱ्याखाली अडकले. प्राथमिक माहितीनुसार, सुमारे ४० ते ५० नागरिक या दुर्घटनेत अडकले होते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. नातेवाइकांचा आक्रोश, जखमींच्या मदतीसाठी सुरू असलेली धावपळ आणि बचावकार्यामुळे परिसरात भीषण परिस्थिती निर्माण झाली.

Also Read : कोलकाता हादरले! चोरबागान दुर्गा पूजा मंडपात सप्तमीच्या संध्याकाळी चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जखमींना बाहेर काढून ग्वाल्हेरमधील विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले. जखमींपैकी पाच ते सहा जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेकांना गंभीर स्वरूपाची हाडांची दुखापत झाली आहे. घटनास्थळी बंदोबस्तासाठी तैनात असलेले दोन पोलीस कर्मचारीही या दुर्घटनेत जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अवजड वाहनांना प्रवेशबंदी असताना आणि पोलिसांनी बॅरिकेड्स लावलेले असतानाही ट्रक मंदिराच्या मार्गावर कसा पोहोचला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ट्रकचालकाने तपासणी नाक्यावरील निर्बंधांचे उल्लंघन कसे केले आणि दुर्घटनेमागे नेमकी कोणती कारणे होती, याचा तपास सुरू आहे.  या दुर्घटनेमुळे ग्वाल्हेरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tags: accidentGwaliorGwalior Truck AccidentTruck
Previous Post

कोलकाता हादरले! चोरबागान दुर्गा पूजा मंडपात सप्तमीच्या संध्याकाळी चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर

Next Post

आझाद समाज पार्टीला नाशिकमध्ये खिंडार! जिल्हाध्यक्ष साहिल सोनवणे संपूर्ण संघटनेसह वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आझाद समाज पार्टीला नाशिकमध्ये खिंडार! जिल्हाध्यक्ष साहिल सोनवणे संपूर्ण संघटनेसह वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर!
बातमी

आझाद समाज पार्टीला नाशिकमध्ये खिंडार! जिल्हाध्यक्ष साहिल सोनवणे संपूर्ण संघटनेसह वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर!

by mosami kewat
October 18, 2026
0

नाशिक : नाशिकच्या राजकीय पटलावर आज मोठी राजकीय घडामोड घडली. आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष साहिल सोनवणे यांनी वंचित बहुजन आघाडीचे...

Read moreDetails
ग्वाल्हेरमध्ये भीषण अपघात!  ट्रकच्या धडकेत १४ भाविक ठार, २९ जण जखमी

ग्वाल्हेरमध्ये भीषण अपघात!  ट्रकच्या धडकेत १४ भाविक ठार, २९ जण जखमी

October 18, 2026
कोलकाता हादरले! चोरबागान दुर्गा पूजा मंडपात सप्तमीच्या संध्याकाळी चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर

कोलकाता हादरले! चोरबागान दुर्गा पूजा मंडपात सप्तमीच्या संध्याकाळी चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर

October 18, 2026
दुष्काळाच्या नावावर सरकारला लागले भिकेचे डोहाळे, शेतकऱ्यांना मदतीचा आराखडा नाही, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मात्र डल्ला – राजेंद्र पातोडे 

दुष्काळाच्या नावावर सरकारला लागले भिकेचे डोहाळे, शेतकऱ्यांना मदतीचा आराखडा नाही, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मात्र डल्ला – राजेंद्र पातोडे 

October 17, 2026
चलो अकोला! धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त अकोल्यात लाखांचा जनसागर उसळणार; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन

चलो अकोला! धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त अकोल्यात लाखांचा जनसागर उसळणार; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन

October 17, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home