Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मान्सून तोंडावर; चितलवाडीतील सांडपाणी नाल्यांची तातडीने स्वच्छता करण्याची वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी

mosami kewat by mosami kewat
June 2, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मान्सून तोंडावर; चितलवाडीतील सांडपाणी नाल्यांची तातडीने स्वच्छता करण्याची वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी

मान्सून तोंडावर; चितलवाडीतील सांडपाणी नाल्यांची तातडीने स्वच्छता करण्याची वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी

अकोला : मान्सूनचे आगमन जवळ आले असताना चितलवाडी गावातील सांडपाणी नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ, प्लास्टिक व इतर कचरा साचल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबणे, अस्वच्छता वाढणे तसेच नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन युवा आघाडीचे तेल्हारा तालुका प्रसिद्धीप्रमुख रोहित जानूजी हिवराळे यांनी ग्रामपंचायत सचिव, चितलवाडी यांना निवेदन सादर करून गावातील सर्व सांडपाणी नाल्यांची तातडीने पाहणी करून त्यांची स्वच्छता करण्याची मागणी केली आहे. (Chitalwadi Drain Cleaning)

Also Read : कल्याण हादरले: आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून बापानेच केली मुलीची हत्या; आरोपी वडिलांना अटक

निवेदनात नमूद केल्यानुसार, अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा साचल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. वेळेत स्वच्छता न झाल्यास पावसाळ्यात पाणी साचून डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता असून त्यामुळे विविध साथीचे रोग फैलावण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

ग्रामपंचायतीने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन गावातील सर्व नाल्यांची तात्काळ स्वच्छता मोहीम राबवावी आणि नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी रोहित हिवराळे यांनी केली आहे. तसेच मान्सूनपूर्व उपाययोजनांचा भाग म्हणून नाल्यांमधील गाळ व कचरा हटवून पाण्याचा सुरळीत निचरा सुनिश्चित करावा, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

Also Read : लाडकी बहीण योजनेचे चार महिन्यांचे हप्ते रखडले; लाखो महिलांमध्ये नाराजी, 80 लाख लाभार्थी अपात्र

गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वाची असून ग्रामपंचायतीने त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (Chitalwadi Drain Cleaning)

Tags: Akola newsChitalwadi Drain CleaningChitalwadi VillageDrainage Cleaning DriveGram Panchayat ChitalwadiMonsoonMonsoon PreparednessTelhara Taluka NewsVanchit Bahujan Yuva Aghadi
Previous Post

कल्याण हादरले: आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून बापानेच केली मुलीची हत्या; आरोपी वडिलांना अटक

Next Post

परतूरमध्ये आचारसंहितेचा फज्जा! पाणी योजनेच्या उद्घाटनावरून वाद; वंचित बहुजन आघाडीची गुन्हा दाखल करण्याची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सामान्य नागरिकांची / शेतकऱ्यांची/ विद्यार्थ्यांची आंदोलने आणि नवउदारमतवाद
बातमी

सामान्य नागरिकांची / शेतकऱ्यांची/ विद्यार्थ्यांची आंदोलने आणि नवउदारमतवाद

by mosami kewat
July 26, 2026
0

- संजीव चांदोरकर  दिल्लीत पाच दिवसांपूर्वी सुरू झालेले जंतर-मंतर वरील विद्यार्थी तरुणांचे आंदोलन पुराचे पाणी पसरते तसे देशभर पसरत चालले...

Read moreDetails
अनाहत सिंगचा कॅनडामध्ये ऐतिहासिक पराक्रम! ज्युनियर स्क्वॉश वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय

अनाहत सिंगचा कॅनडामध्ये ऐतिहासिक पराक्रम! ज्युनियर स्क्वॉश वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय

July 26, 2026
जंतर-मंतर ते महाराष्ट्र बंद…धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; जंतर-मंतरवरील युवकांच्या आंदोलनाला मोठे यश

जंतर-मंतर ते महाराष्ट्र बंद…धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; जंतर-मंतरवरील युवकांच्या आंदोलनाला मोठे यश

July 25, 2026
विद्यार्थ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करावे; प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात उभारा ‘सब-सेंटर’ : ॲड. प्रकाश आंबेडकर

विद्यार्थ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करावे; प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात उभारा ‘सब-सेंटर’ : ॲड. प्रकाश आंबेडकर

July 25, 2026
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ दर्यापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ दर्यापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली

July 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home