Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सर्वोच्च न्यायालयासाठी पाच नव्या न्यायाधीशांच्या नियुक्तीला केंद्राची मंजुरी; मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांचेही नाव

mosami kewat by mosami kewat
June 1, 2026
in बातमी, राजकीय
0
सर्वोच्च न्यायालयासाठी पाच नव्या न्यायाधीशांच्या नियुक्तीला केंद्राची मंजुरी; मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांचेही नाव

सर्वोच्च न्यायालयासाठी पाच नव्या न्यायाधीशांच्या नियुक्तीला केंद्राची मंजुरी; मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांचेही नाव

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने शिफारस केलेल्या पाच नावांना केंद्र सरकारने मंजुरी दिली असून सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रक्रियेला वेग मिळाला आहे. कॉलेजियमने पाठविलेल्या प्रस्तावावर केंद्र सरकारने अवघ्या दोन दिवसांत निर्णय घेतल्याने न्यायव्यवस्थेतील नियुक्ती प्रक्रियेतील ही तत्परता चर्चेचा विषय ठरली आहे.

कॉलेजियमने पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शील नागू, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव सचदेवा, जम्मू-काश्मीर व लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अरुण पल्ली तसेच ज्येष्ठ वकील व्ही. मोहना यांच्या नावांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी शिफारस केली होती. (Supreme Court Judge Appointment)

Also Read : नांदेड: चिखलीतील मराठा युवकांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश!

या सर्व नावांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या नियुक्त्यांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर यांचे देखील नाव आहे. त्यांच्या कार्यकाळात दिलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांमुळे ते चर्चेत राहिले आहेत. ज्या निर्णयामुळे त्यांच्यावर विविध स्तरांतून टीका झाली होती.  

त्यांच्या कार्यकाळातील काही महत्त्वाचे निर्णय:

• राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना देण्यात आलेल्या Z+ सुरक्षा व्यवस्थेवर झालेला खर्च वसूल करण्यासाठी दाखल करण्यात आलेली जनहित याचिका (PIL) फेटाळून लावली.

• BKC मधील भूखंडांशी संबंधित MMRDA ने लावलेल्या दंडाच्या नोटिसा रद्द केल्या आणि रिलायन्स इंडस्ट्रीजसह संबंधित पक्षांना ₹७०० कोटींपेक्षा अधिक रक्कम परत करण्याचे आदेश दिले.

• अदानी ग्रीन एनर्जी आणि इतर संबंधितांवरील कथित लाचखोरी प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली.

• मेट्रो-६ कारशेड प्रकल्पासाठी कांजूरमार्ग येथील जमीन हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली.

• वर्सोवा-भाईंदर किनारी रस्ता प्रकल्पासाठी ४५,६७५ खारफुटी (मॅन्ग्रोव्ह) झाडे तोडण्यास परवानगी दिली. यामागे स्पष्ट व सिद्ध झालेला सार्वजनिक हिताचा उद्देश असल्याचे नमूद केले.

• २००६ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील उर्वरित चार आरोपींवरील आरोप रद्द केले.

• सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणातील सर्व २२ आरोपींची निर्दोष मुक्तता कायम ठेवली होती.

Tags: Bombay High CourtCollegium SystemCourt UpdatesIndian JudiciaryJudicial AppointmentsJudiciary NewsJustice ChandrashekharLegal Newssupreme courtSupreme Court JudgesSupreme Court Of India
Previous Post

औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन; पदाधिकारी उपस्थित!

Next Post

पिंपरी-चिंचवडमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

Next Post
पिंपरी-चिंचवडमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

पिंपरी-चिंचवडमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बागकाम की राजकीय संघर्ष? पर्यावरणाचा खरा लढा
बातमी

बागकाम की राजकीय संघर्ष? पर्यावरणाचा खरा लढा

by mosami kewat
September 10, 2026
0

- संजीव चांदोरकर  “नेपाळ जलप्रलय” निमित्ताने !  त्याची थरकाप उडवणारी दृश्ये / फोटो, आकडे बघत/ वाचत असतो, त्याची पुनरुक्ती नाही...

Read moreDetails
साकेत (अयोध्या) नगरी बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराचे प्रमुख केंद्र : प्रा. डी. एस. ननिर

साकेत (अयोध्या) नगरी बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराचे प्रमुख केंद्र : प्रा. डी. एस. ननिर

September 10, 2026
राहुरी नगरपालिकेवर धडकलेल्या आदिवासी बिऱ्हाड आंदोलनाला मोठे यश; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाची दखल

राहुरी नगरपालिकेवर धडकलेल्या आदिवासी बिऱ्हाड आंदोलनाला मोठे यश; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाची दखल

September 10, 2026
ठाणे येथे वंचित बहुजन आघाडीच्या कोअर कमिटी बैठकीत निर्णय: ‘जय भीम GEN Z’ अभियानाच्या नियोजनासाठी ९ सदस्यीय ‘VBA ऍक्शन ग्रुप-२०२६’ची स्थापना

ठाणे येथे वंचित बहुजन आघाडीच्या कोअर कमिटी बैठकीत निर्णय: ‘जय भीम GEN Z’ अभियानाच्या नियोजनासाठी ९ सदस्यीय ‘VBA ऍक्शन ग्रुप-२०२६’ची स्थापना

September 10, 2026
प्रकाश आंबेडकर का मोदी सरकार पर हमला : “कठिन दौर में भारत को ईरान का साथ देना चाहिए”

प्रकाश आंबेडकर का मोदी सरकार पर हमला : “कठिन दौर में भारत को ईरान का साथ देना चाहिए”

September 10, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home