नागपूर : वंचित बहुजन आघाडीच्या आगामी कार्यक्रमांचे नियोजन, संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे तसेच लोकशाहीला पूरक विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत रविभवन, नागपूर येथे सविस्तर चर्चा करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली.
यावेळी संघटनेची भूमिका आणि विचार जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, कार्यकर्त्यांनी आपापल्या संघटनात्मक जबाबदाऱ्या अधिक सक्षमपणे पार पाडणे तसेच आगामी कार्यक्रमांचे नियोजन शिस्तबद्ध आणि प्रभावी पद्धतीने करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
लोकशाही मूल्ये अधिक बळकट करण्यासाठी जनहिताचे विविध उपक्रम राबविणे, सामाजिक प्रश्नांवर लोकशाही मार्गाने आवाज उठविणे आणि संघटनेची तळागाळातील बांधणी अधिक मजबूत करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.
आगामी काळात संघटनात्मक कामकाजाला अधिक गती देत जनतेशी संवाद वाढविणे आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.





