मुंबई : इराणच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उद्या, १ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आंदोलन करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘आम्ही भारतीय नागरिक इराणबरोबर आहोत’ हा संदेश देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे इराण भारतासोबत संकटाच्यावेळी बरोबर राहिलेला आहे. आपल्याला स्वस्त तेल मिळवायचे असेल, तर इराण ते देण्यास तयार आहे. त्यामुळे भारताने इस्रायलसोबत असल्याची आपली भूमिका बदलली पाहिजे. मध्यंतरी भारताने इस्रायलला शस्त्रास्त्रे विकली आहेत; हे थांबवले पाहिजे. भारत सरकारने इराणबरोबर असल्याची भूमिका घ्यावी आणि भारतीय जनता इराण देशाबरोबर आहे, हे दाखवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
भारत सरकारने इराणसोबतची भूमिका स्पष्टपणे मांडावी आणि भारतीय जनता इराणच्या पाठीशी असल्याचा संदेश देण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने करण्यात आले आहे.





