Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

कल्याण हादरले: आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून बापानेच केली मुलीची हत्या; आरोपी वडिलांना अटक

mosami kewat by mosami kewat
June 2, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
कल्याण हादरले: आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून बापानेच केली मुलीची हत्या; आरोपी वडिलांना अटक

कल्याण हादरले: आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून बापानेच केली मुलीची हत्या; आरोपी वडिलांना अटक

कल्याण : कल्याण पश्चिमेतील पारेकरवाडी परिसरात घडलेल्या विवाहित मुलीच्या हत्येप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी तीन दिवसांपासून फरार असलेल्या आरोपी वडिलांना अटक केली आहे. पोलिस तपासात या हत्येमागील कारण म्हणून मुलीने कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध केलेला आंतरजातीय प्रेमविवाह असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद वसईकर यांनी आपल्या मुलगी गायत्री वसईकर हिची धारदार शस्त्राने हत्या केली होती. गायत्री विवाहानंतर काही दिवसांसाठी माहेरी आली असताना ही घटना घडली. हत्येनंतर आरोपी वडील घटनास्थळावरून फरार झाले होते. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार केली. तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या शोधमोहीमेनंतर पोलिसांनी विनोद वसईकर यांना अखेर ताब्यात घेतले.

Also Read : लाडकी बहीण योजनेचे चार महिन्यांचे हप्ते रखडले; लाखो महिलांमध्ये नाराजी, 80 लाख लाभार्थी अपात्र

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. गायत्रीने कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता इतर जातीतील तरुणाशी प्रेमविवाह केला होता. या विवाहाला तिच्या वडिलांचा तीव्र विरोध होता. यापूर्वी तिच्यासाठी दोन वेळा साखरपुड्याची तयारी करण्यात आली होती; मात्र गायत्रीने ते प्रस्ताव नाकारून स्वतःच्या पसंतीने विवाह केला होता.

Also Read :विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्या पीडित कुटुंबीयांची वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष यांनी घेतली भेट

घटनेच्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर वडील आणि मुलगी यांच्यात विवाहाच्या मुद्द्यावरून पुन्हा वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात विनोद वसईकर यांनी धारदार शस्त्राने गायत्रीवर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या गायत्रीचा जागीच मृत्यू झाला. चौकशीदरम्यान मुलीच्या आंतरजातीय विवाहाविषयीच्या नाराजीतूनच आपण हे कृत्य केल्याची कबुली आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बाजारपेठ पोलीस करत आहेत.

Tags: Ahmadnagar crime newsFather Kills DaughterHonor KillingInter-Caste Love MarriageInter-Caste MarriageKalyan Crime NewsKalyan Murder CaseMaharashtra Crime Newspolice
Previous Post

लाडकी बहीण योजनेचे चार महिन्यांचे हप्ते रखडले; लाखो महिलांमध्ये नाराजी, 80 लाख लाभार्थी अपात्र

Next Post

मान्सून तोंडावर; चितलवाडीतील सांडपाणी नाल्यांची तातडीने स्वच्छता करण्याची वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सामान्य नागरिकांची / शेतकऱ्यांची/ विद्यार्थ्यांची आंदोलने आणि नवउदारमतवाद
बातमी

सामान्य नागरिकांची / शेतकऱ्यांची/ विद्यार्थ्यांची आंदोलने आणि नवउदारमतवाद

by mosami kewat
July 26, 2026
0

- संजीव चांदोरकर  दिल्लीत पाच दिवसांपूर्वी सुरू झालेले जंतर-मंतर वरील विद्यार्थी तरुणांचे आंदोलन पुराचे पाणी पसरते तसे देशभर पसरत चालले...

Read moreDetails
अनाहत सिंगचा कॅनडामध्ये ऐतिहासिक पराक्रम! ज्युनियर स्क्वॉश वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय

अनाहत सिंगचा कॅनडामध्ये ऐतिहासिक पराक्रम! ज्युनियर स्क्वॉश वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय

July 26, 2026
जंतर-मंतर ते महाराष्ट्र बंद…धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; जंतर-मंतरवरील युवकांच्या आंदोलनाला मोठे यश

जंतर-मंतर ते महाराष्ट्र बंद…धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; जंतर-मंतरवरील युवकांच्या आंदोलनाला मोठे यश

July 25, 2026
विद्यार्थ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करावे; प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात उभारा ‘सब-सेंटर’ : ॲड. प्रकाश आंबेडकर

विद्यार्थ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करावे; प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात उभारा ‘सब-सेंटर’ : ॲड. प्रकाश आंबेडकर

July 25, 2026
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ दर्यापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ दर्यापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली

July 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home