पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारू प्रकरणामुळे झालेल्या मृत्यूंमुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष अनिल जाधव यांनी दापोडी येथे भेट देत विषारी दारू प्राशनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीदरम्यान अनिल जाधव यांनी पीडित कुटुंबीयांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी त्यांनी पीडित परिवाराच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारने खर्च उचलण्याची मागणी केली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.
उल्हासनगर महानगरपालिका स्वीकृत नगरसेवक पदी वंचित बहुजन आघाडीच्या आशा पवार यांची निवड!
उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी वंचित बहुजन आघाडीच्या आशा पवार यांची निवड झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे उल्हासनगर...
Read moreDetails






