ॲड. प्रकाश आंबेडकर : NEET परीक्षा UPSC कडे सोपवली पाहिजे
मुंबई : धर्मेंद्र प्रधान यांनी 23 लाख विद्यार्थ्यांचे करिअर आणि भविष्य धोक्यात घातले आल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे केली.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, भारताचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अद्याप राजीनामा का दिलेला नाही? धर्मेंद्र प्रधान यांचा अहंकार आणि गर्वच त्यांना राजीनामा देण्यापासून रोखत आहे.
Also Read : बोईसर ग्रामपंचायतीच्या ‘त्या’ कारवाईविरोधात बेमुदत धरणे आंदोलन; १५ दिवस उलटूनही प्रशासन सुस्त!
त्यांचा अहंकार हा त्यांच्या मंत्रिपदाच्या खुर्चीशी असलेल्या आसक्तीचे प्रतीक आहे आणि NEET-UG 2026 चा प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर 23 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया गेल्याची वस्तुस्थिती स्वीकारण्यास ते तयार नाहीत, हे दर्शवतो. असेही ॲड. आंबेडकरांनी म्हटले.
NEET परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया सुधारली पाहिजे आणि ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (UPSC) सोपवली पाहिजे.परंतु त्याआधी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला हवा. कारण त्यांनी 23 लाख विद्यार्थ्यांचे करिअर आणि भविष्य धोक्यात घातले असल्याचे त्यांनी म्हटले.




