Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

४५ हजारांची लाच स्वीकारताना महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात; वसई-विरार महसूल विभागात खळबळ

mosami kewat by mosami kewat
May 26, 2026
in बातमी
0
४५ हजारांची लाच स्वीकारताना महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात; वसई-विरार महसूल विभागात खळबळ

४५ हजारांची लाच स्वीकारताना महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात; वसई-विरार महसूल विभागात खळबळ

नालासोपारा : पालघर जिल्ह्यातील पेल्हार परिसरात महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार समोर आला असून, एका महिला तलाठ्याला ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. उज्वला प्रवीण पाटील (४८) असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.

तक्रारदार व त्यांच्या मामांचा चाळ बांधकामाशी संबंधित व्यवसाय आहे. त्यांनी २०१५ मध्ये मौजे बिलालपाडा येथील सर्व्हे क्रमांक १३/३ मधील जमीन खरेदी केली होती. या जागेवर न्यायालयीन वाद सुरू असतानाही चार खोल्यांचे बांधकाम तसेच माती भरावाचे काम करण्यात आले होते. (Bribe case)

Also Read : इबोला कोरोनापेक्षाही डेंजर, WHO ने घोpषित केली आंतरराष्ट्रीय आणीबाणी; परदेशातून येणाऱ्यांची आता पुणे विमानतळावर होणार तपासण

या बांधकामाची पाहणी करण्यासाठी तलाठी उज्वला पाटील घटनास्थळी गेल्या होत्या. आरोपानुसार, संबंधित बांधकाम व माती भरावाचा पंचनामा टाळण्यासाठी त्यांनी सुरुवातीला ५० हजार रुपयांची मागणी केली. नंतर बांधकामासाठी ४५ हजार रुपये आणि माती भरावासाठी १ लाख ५० हजार रुपये, अशी एकूण १ लाख ९५ हजार रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली. या मागणीमुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने पालघर एसीबी कार्यालयात तक्रार नोंदवली.

Also Read : 23 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्या शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा – ॲड. प्रकाश आंबेडकर

एसीबीने २१ आणि २२ मे रोजी पडताळणी केली असता लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सोमवारी पेल्हारगाव येथील तलाठी कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ४५ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी उज्वला पाटील यांना रंगेहात अटक केली. या घटनेमुळे महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.

Tags: ACBAnti CorruptionBribe CaseBriberyCorruptionCrime newsMaharashtra newsNalasoparapalgharRevenue DepartmentVasaiVirar
Previous Post

23 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्या शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

मोदी सरकार शिक्षण व्यवस्थेसाठी कर्दनकाळ ?

Next Post
मोदी सरकार शिक्षण व्यवस्थेसाठी कर्दनकाळ ?

मोदी सरकार शिक्षण व्यवस्थेसाठी कर्दनकाळ ?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दुष्काळाच्या नावावर सरकारला लागले भिकेचे डोहाळे, शेतकऱ्यांना मदतीचा आराखडा नाही, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मात्र डल्ला – राजेंद्र पातोडे 
बातमी

दुष्काळाच्या नावावर सरकारला लागले भिकेचे डोहाळे, शेतकऱ्यांना मदतीचा आराखडा नाही, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मात्र डल्ला – राजेंद्र पातोडे 

by mosami kewat
October 17, 2026
0

मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी राज्य सरकारने अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातून एक दिवसाचे वेतन कापण्याचे परिपत्रक काढले...

Read moreDetails
चलो अकोला! धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त अकोल्यात लाखांचा जनसागर उसळणार; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन

चलो अकोला! धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त अकोल्यात लाखांचा जनसागर उसळणार; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन

October 17, 2026
दलित आदिवासी वस्त्यांच्या पाणीप्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचा तोडगा, कृती आराखडा मधील कामे स्थगित करून निधी पाणीपुरवठ्यासाठी वळवा – राजेंद्र पातोडे 

दलित आदिवासी वस्त्यांच्या पाणीप्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचा तोडगा, कृती आराखडा मधील कामे स्थगित करून निधी पाणीपुरवठ्यासाठी वळवा – राजेंद्र पातोडे 

October 17, 2026
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी

October 16, 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

October 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home