Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

भारताच्या अपमानावर मोदी गप्प का? ॲड. प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधान मोदींवर संताप !

mosami kewat by mosami kewat
April 23, 2026
in Uncategorized, बातमी, राजकीय, सामाजिक
0
भारताच्या अपमानावर मोदी गप्प का? ॲड. प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधान मोदींवर संताप !
       

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या सोशल मीडियावरील ट्विटद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आणि त्यांच्या परराष्ट्र धोरणांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारताला ‘नर्क’ संबोधून देशाचा अपमान केल्याचा दावा करत, ॲड. आंबेडकर यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधानांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

त्यांच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव ‘एपस्टीन फाइल’मध्ये आल्यापासून ते अमेरिकेसमोर कोणतीही भूमिका न घेता शरणागती पत्करत आहेत, ज्याचा फटका देशाला बसत आहे. या मौनामुळेच भारत आणि पंतप्रधान मोदी यांची जगभरात थट्टा उडवली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. (Prakash Ambedkar)

आपल्या ट्विटमध्ये ॲड. आंबेडकर यांनी अशा अनेक घटनांचा उल्लेख केला आहे, ज्यात अमेरिकेने भारताचा अपमान केला आणि पंतप्रधान मोदींनी त्यावर मौन बाळगले. त्यांनी नमूद केले की, अमेरिकेने भारतीय नागरिकांना बेड्या ठोकून भारतात पाठवले, भारतावर भारी आयात शुल्क (टॅरिफ) लादले आणि भारत-पाकिस्तान युद्धाच्या विषयावर ट्रंप यांनी एकतर्फी भूमिका घेतली, तरीही मोदी गप्प राहिले. तसेच, रशियाकडून तेल खरेदी न करण्याच्या अमेरिकेच्या आदेशाचे भारताने पालन करणे आणि इराणसारख्या आपल्या पारंपरिक मित्राशी संबंध बिघडणे यांसारख्या बाबींवरही पंतप्रधानांनी शांत राहणे पसंत केले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर, अमेरिकेला पंतप्रधान मोदींच्या अशा कोणत्या ‘काळ्या कारनाम्यांची’ माहिती आहे, ज्यामुळे ते सातत्याने होणारी ही बेइज्जती गप्प बसून सहन करत आहेत, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी पंतप्रधानांच्या मौनाचा खरपूस समाचार घेतला.


       
Tags: Americandonald trampEpstein fileMaharashtramumbainarendra modiNarendra Modi Epstein filePoliticalPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

पुस्तकांशी नाते सांगणारे राजगृह 

Next Post

एकनाथ शिंदे यांच्या आमदाराचा बालिशपणा ; ‘शिवाजी कोण होता?’  या पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकावले !

Next Post
एकनाथ शिंदे यांच्या आमदाराचा बालिशपणा ; ‘शिवाजी कोण होता?’  या पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकावले !

एकनाथ शिंदे यांच्या आमदाराचा बालिशपणा ; 'शिवाजी कोण होता?'  या पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकावले !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गोड साखरेची कडू कहाणी ; साखरेच्या दरवाढीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर आक्रमक 
बातमी

गोड साखरेची कडू कहाणी ; साखरेच्या दरवाढीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर आक्रमक 

by mosami kewat
August 22, 2026
0

जनतेने लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर आंदोलन करण्याचे आवाहन औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता...

Read moreDetails
राम माधव यांच्या ISI अधिकाऱ्यांसोबतच्या भेटीवरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल; मोहन भागवतांकडे खुलाशाची मागणी

राम माधव यांच्या ISI अधिकाऱ्यांसोबतच्या भेटीवरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल; मोहन भागवतांकडे खुलाशाची मागणी

August 22, 2026
मनमाडमध्ये सार्वजनिक जागेवर खाजगी टर्फ उभारण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध; उद्घाटनास विरोध करण्याचा इशारा

मनमाडमध्ये सार्वजनिक जागेवर खाजगी टर्फ उभारण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध; उद्घाटनास विरोध करण्याचा इशारा

August 22, 2026
आदिवासी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या नर्सिंग महाविद्यालयांवर कारवाई करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

आदिवासी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या नर्सिंग महाविद्यालयांवर कारवाई करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

August 22, 2026
अखेर वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक भूमिकेनंतर यवतमाळ नगर परिषदेची माघार!

अखेर वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक भूमिकेनंतर यवतमाळ नगर परिषदेची माघार!

August 21, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home