Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मुद्रा मोदी ते मुजरा मोदी आंदोलनाला भारतीय बौद्ध महासभेचा पाठिंबा ; उद्या मुंबईत महाआंदोलन

mosami kewat by mosami kewat
March 1, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मुद्रा मोदी ते मुजरा मोदी आंदोलनाला भारतीय बौद्ध महासभेचा पाठिंबा ; उद्या मुंबईत महाआंदोलन
       

मुंबई : एपस्टीन फाईल प्रकरण, अमेरिकेशी एकतर्फी व्यापार प्रकरण, पंतप्रधान मोदी यांचा एपस्टिन फाइल्समध्ये उल्लेख यावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आले असून याविरोधात वेगवेगळ्या सामाजिक संघटना आणि वंचित बहुजन आघाडीच्यावतीने उद्या, सोमवार २ मार्च २०२६ रोजी मुंबईत दुपारी १२:०० वाजता एका भव्य आंदोलनाचे आयोजन करणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारतीय बौद्ध महासभेचे कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

भारतीय बौद्ध महासभेचा जाहीर पाठिंबा :

या आंदोलनाला भारतीय बौद्ध महासभेने आपला सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे. महासभेचे ट्रस्टी व राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष एस. के. भंडारे यांच्या सूचनेनुसार, महासभेच्या सर्व शाखांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या या महा आंदोलनात महाराष्ट्र राज्य (महिला व पुरुष), मुंबई प्रदेश कार्यकारिणी, झोन १ ते ६ मधील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या आंदोलनादरम्यान शिस्त राखण्यासाठी आणि संरक्षणासाठी समता सैनिक दलाच्या सर्व अधिकार्‍यांना आणि सैनिकांना पूर्ण गणवेशात (ड्रेस कोड) उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

‘एफस्टीन फाईल’ मधील धक्कादायक बाबींचा निषेध नोंदवण्यासाठी आणि या प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात येत असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. 


       
Tags: Epstein fileMumbai protestnarendra modiPrakash Ambedkar
Previous Post

मुद्रा मोदी ते मुजरा मोदी आंदोलन : पोलिसांकडून अडवणूक; नागरिकांचा पोलिसांना विरोध!

Next Post

CBSE चा मोठा निर्णय! इंग्रजीची सक्ती रद्द; २०२६-२७ पासून ‘त्रिभाषा सूत्र’ लागू

Next Post
CBSE चा मोठा निर्णय! इंग्रजीची सक्ती रद्द; २०२६-२७ पासून ‘त्रिभाषा सूत्र’ लागू

CBSE चा मोठा निर्णय! इंग्रजीची सक्ती रद्द; २०२६-२७ पासून 'त्रिभाषा सूत्र' लागू

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
लिंबे वडगाव भूसंपादन घोटाळा प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
बातमी

लिंबे वडगाव भूसंपादन घोटाळा प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

by mosami kewat
July 2, 2026
0

जालना : मंठा तालुक्यातील लिंबे वडगाव येथील पाटोदा साठवण तलाव भूसंपादन प्रकरणातील कथित अनियमितता आणि भूसंपादन अनुदान घोटाळ्याच्या निषेधार्थ वंचित...

Read moreDetails
अकोल्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी

अकोल्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी

July 2, 2026
सुखदेव जी महाराजांना ॲड. प्रकाश आंबेडकर यांची श्रद्धांजली; समाज प्रबोधनातील योगदानाला सलाम

सुखदेव जी महाराजांना ॲड. प्रकाश आंबेडकर यांची श्रद्धांजली; समाज प्रबोधनातील योगदानाला सलाम

July 1, 2026
शिक्षणमंत्री दादा भुसे विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; मंत्र्याच्या घराबाहेर आंदोलन!

शिक्षणमंत्री दादा भुसे विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; मंत्र्याच्या घराबाहेर आंदोलन!

July 1, 2026
रिकामे महाल, बेघर नागरिक: K-शेप अर्थव्यवस्थेचे भीषण चित्र

रिकामे महाल, बेघर नागरिक: K-शेप अर्थव्यवस्थेचे भीषण चित्र

July 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home