Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

NEET पेपरफुटी, दरवाढ आणि स्मार्ट मीटरविरोधात वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश मोर्चा

mosami kewat by mosami kewat
June 19, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
NEET पेपरफुटी, दरवाढ आणि स्मार्ट मीटरविरोधात वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश मोर्चा
       
कोल्हापूर : विविध जनहिताच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी इचलकरंजी येथे भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या विविध धोरणांविरोधात निषेध व्यक्त केला.

यावेळी नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाचा निषेध करत लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच गॅस, पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला.

महावितरणकडून सक्तीने बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटर योजनाही जनविरोधी असल्याचा आरोप करत ती तात्काळ थांबविण्याची मागणी आंदोलकांनी केली. याशिवाय सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीयांसाठी असलेल्या निधीचा “लाडकी बहीण” योजनेसाठी वापर केल्याबद्दलही तीव्र निषेध नोंदविण्यात आला.

मोर्चाला वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड, जिल्हा सचिव अरुण जामने तसेच शिरोळ तालुकाध्यक्ष संदीप कांबळे यांनी मार्गदर्शन केले. शासनाने जनतेच्या प्रश्नांवर तात्काळ सकारात्मक भूमिका घ्यावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. मोर्चाच्या शेवटी उपविभागीय अधिकारी, इचलकरंजी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली.

Tags: ichalkarnjiMaharashtraNEET ScamNEET UG 2026Smart MeterVanchit Bahujan Aaghadivbaforindiaकोल्हापूर
Previous Post

सेवलीला अप्पर तहसील कार्यालय न मिळाल्याने ‘वंचित’ आक्रमक; सेवलीत एकदिवसीय धरणे आंदोलन

Next Post

नांदेड : लेबर कॉलनी येथे नवीन डीपीचे उद्घाटन; नागरिकांना कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येतून दिलासा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
देहराडूनमध्ये १६ कोटींच्या पुलाच्या जोडरस्त्याला तडा; उद्घाटनानंतर अवघ्या १६ दिवसांतच वाहतूक ठप्प
बातमी

देहराडूनमध्ये १६ कोटींच्या पुलाच्या जोडरस्त्याला तडा; उद्घाटनानंतर अवघ्या १६ दिवसांतच वाहतूक ठप्प

by mosami kewat
July 29, 2026
0

देहराडून : उत्तराखंडमधील देहराडून येथे नंदा की चौकी परिसरात सुमारे १६ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नव्या पुलाच्या जोडरस्त्याचा मोठा...

Read moreDetails
शिक्षणाचे केंद्रीकरण म्हणजे शिक्षणाचे बाजारीकरण; केंद्रीय परीक्षा समाजव्यवस्थेच्या फायद्याच्या नाहीत : ॲड. प्रकाश आंबेडकर

शिक्षणाचे केंद्रीकरण म्हणजे शिक्षणाचे बाजारीकरण; केंद्रीय परीक्षा समाजव्यवस्थेच्या फायद्याच्या नाहीत : ॲड. प्रकाश आंबेडकर

July 29, 2026
मूग उत्पादकांचा संताप शिगेला; हजारो शेतकऱ्यांचा भोपाळकडे एल्गार, 100 टक्के MSPची ठाम मागणी

मूग उत्पादकांचा संताप शिगेला; हजारो शेतकऱ्यांचा भोपाळकडे एल्गार, 100 टक्के MSPची ठाम मागणी

July 29, 2026
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण अपडेट : पुढील सुनावणीत न्यायालय ठरवणार नियमावली; ॲड. प्रकाश आंबेडकरांची माहिती

सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण अपडेट : पुढील सुनावणीत न्यायालय ठरवणार नियमावली; ॲड. प्रकाश आंबेडकरांची माहिती

July 28, 2026
पॅरा-ॲथलेटिक्समध्ये भारताचा ऐतिहासिक डंका: शर्मिला धनखडची सुवर्ण कामगिरी, शिल्पा शायलाने जिंकले कांस्य

पॅरा-ॲथलेटिक्समध्ये भारताचा ऐतिहासिक डंका: शर्मिला धनखडची सुवर्ण कामगिरी, शिल्पा शायलाने जिंकले कांस्य

July 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home