Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नवी मुंबई महापालिकेतील मागासवर्गीय अधिकाऱ्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्याची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे आयुक्तांना निवेदन

mosami kewat by mosami kewat
June 23, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
नवी मुंबई महापालिकेतील मागासवर्गीय अधिकाऱ्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्याची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे आयुक्तांना निवेदन
       
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेदरम्यान विधी अधिकारी अभय जाधव यांच्यावर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईविरोधात वंचित बहुजन आघाडी नवी मुंबईने आक्रमक भूमिका घेतली आहे. सदर कारवाई जातीवादी मानसिकतेतून करण्यात आल्याचा आरोप करत ती तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

महासभेत अभय जाधव यांच्या निलंबनाचा ठराव मंजूर झाल्याची माहिती मिळाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप यांनी या प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर अन्यायकारक व जातीवादी दृष्टिकोनातून कारवाई झाल्याचा आरोप करत आयुक्तांची भेट घेण्यात आली.

यावेळी आयुक्त कैलास शिंदे यांनी महासभेत मंजूर झालेला निलंबनाचा ठराव अद्याप त्यांच्याकडे प्राप्त झालेला नसल्याचे स्पष्ट केले. संबंधित ठराव आयुक्तांकडे आल्यानंतर त्यावर नियमानुसार विचार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अद्याप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आलेला नसल्याचा मुद्दाही उपस्थित केला. महानगरपालिकेच्या महासभेत विशेष चर्चा घडवून आणत येत्या १५ दिवसांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वतः पुतळा उभारण्यात येईल, असा इशारा आयुक्तांना देण्यात आला.

या वेळी जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप, महिला जिल्हाध्यक्षा शिल्पा रणदिवे, महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे, महासचिव अजय शिंदे, उपाध्यक्ष दीपक बाणाईत, उपाध्यक्षा सुरेखा वानखेडे, सचिव कविता हिवाळे, संदेश हत्तरगे, पल्लवी शिंदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते.

Tags: MaharashtramumbaiMunicipal Corporationnew mumbaiPoliticalVanchit Bahujan Aghadi
Previous Post

फुले-शाहू-आंबेडकरवादी जनतेला जाब विचारण्याचे आवाहन; वंचित बहुजन आघाडीची आक्रमक भूमिका

Next Post

Pune News: स्मार्ट मीटरविरोधात वंचित बहुजन आघाडी पुणे शहराचे जनआक्रोश आंदोलन

Next Post
Pune News: स्मार्ट मीटरविरोधात वंचित बहुजन आघाडी पुणे शहराचे जनआक्रोश आंदोलन

Pune News: स्मार्ट मीटरविरोधात वंचित बहुजन आघाडी पुणे शहराचे जनआक्रोश आंदोलन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!
बातमी

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

by mosami kewat
October 3, 2026
0

पुणे : वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश कमिटी आणि ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक आज पुणे येथे पार पडली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष...

Read moreDetails
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026
तरुणांचा राग रस्त्यावर का?

तरुणांचा राग रस्त्यावर का?

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home