Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Pune News: स्मार्ट मीटरविरोधात वंचित बहुजन आघाडी पुणे शहराचे जनआक्रोश आंदोलन

mosami kewat by mosami kewat
June 23, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
Pune News: स्मार्ट मीटरविरोधात वंचित बहुजन आघाडी पुणे शहराचे जनआक्रोश आंदोलन
       

पुणे : वंचित बहुजन आघाडी, पुणे शहराच्या वतीने महावितरणकडून राज्यभरात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसवण्याच्या सक्तीविरोधात आणि वीज ग्राहकांच्या हितसंरक्षणासाठी रास्ता पेठ येथील महावितरण कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.

आंदोलनादरम्यान वीज ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रकाराचा तीव्र निषेध करण्यात आला. वीज ग्राहकांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असताना महावितरणचे कर्मचारी अनेक ठिकाणी कोणतीही पूर्वसूचना न देता जुने मीटर काढून स्मार्ट मीटर बसवत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीज बिल वेळेत न भरल्यास वीजपुरवठा तात्काळ खंडित होण्याची शक्यता असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच स्मार्ट मीटरमुळे वीज बिलामध्ये वाढ होण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली असून, आधीच महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य, गरीब आणि वंचित नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र शासनासह स्वतःला विरोधी पक्ष म्हणवून घेणारे राजकीय पक्षही जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर मौन बाळगत असल्याची टीका करण्यात आली. सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या हिताचा विचार न करता काही मोजक्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी स्मार्ट मीटर योजना राबविली जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आला.

महावितरणने स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती तात्काळ थांबवावी, अन्यथा आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. तसेच स्मार्ट मीटरची होळी करून व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही वंचित बहुजन आघाडी, पुणे शहराच्या वतीने देण्यात आला.

या आंदोलनात वंचित बहुजन आknघाडीच्या पुणे शहरातील विविध विभागांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पर्वती विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


       
Tags: MaharashtraPoliticalPune ProtestVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

नवी मुंबई महापालिकेतील मागासवर्गीय अधिकाऱ्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्याची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे आयुक्तांना निवेदन

Next Post

अल निनो ते एआय: भारतीय शेतीची ताकद आणि आव्हाने

Next Post
अल निनो ते एआय: भारतीय शेतीची ताकद आणि आव्हाने

अल निनो ते एआय: भारतीय शेतीची ताकद आणि आव्हाने

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!
बातमी

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

by mosami kewat
October 3, 2026
0

पुणे : वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश कमिटी आणि ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक आज पुणे येथे पार पडली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष...

Read moreDetails
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026
तरुणांचा राग रस्त्यावर का?

तरुणांचा राग रस्त्यावर का?

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home