Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

फुले-शाहू-आंबेडकरवादी जनतेला जाब विचारण्याचे आवाहन; वंचित बहुजन आघाडीची आक्रमक भूमिका

mosami kewat by mosami kewat
June 22, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
फुले-शाहू-आंबेडकरवादी जनतेला जाब विचारण्याचे आवाहन; वंचित बहुजन आघाडीची आक्रमक भूमिका
       
मुंबई : राज्यात ऑपरेशन टायगरनंतर पुन्हा एकदा मोठी घडामोड पाहायला मिळाली आहे. शिवसेना उबाठाच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. आज राज्यातील विधान परिषद निवडणुकींचा निकाल सुद्धा जाहीर झाला. यात अमरावती, नागपूर, उस्मानाबाद याठिकाणी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी थेट भाजपला मतदान करून भाजपचा विजय घडवून आणला. 

यावर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक प्रतिक्रिया देतांना म्हटले की, शिवसेनेच्या ९ पैकी ६ खासदार भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिंदे शिवसेनेत सामील झाले आहेत.

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या शेकडो नगरसेवकांनी भाजप व भाजप-नेतृत्वाखालील महायुतीच्या उमेदवारांच्या बाजूने क्रॉस-व्होटिंग केले.

ज्या पाकीट पत्रकार आणि तथाकथित विचारवंतांनी संविधान, लोकशाही आणि आरक्षण वाचवण्यासाठी भाजपविरोधात त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते, त्या पत्रकारांच्या आणि विचारवंतांच्या घरासमोर फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांनी शांततापूर्ण मोठे आंदोलन केले पाहिजे. त्यांनी पाठिंबा दिलेले उमेदवार आणि पक्ष एकतर भाजपमध्ये सामील झाले किंवा त्यांनी भाजपला मतदान केले. काही निर्लल्ज लोकांनी फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांची दिशाभूल केली. त्यांना जबाबदार धरले पाहिजे, असे आवाहन केले आहे. 

वंचित बहुजन आघाडीने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे महाविकास आघाडी, विरोधी पक्ष आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या काही पत्रकार व तथाकथित विचारवंतांवर तीव्र टीका केली आहे.

पक्षाने आपल्या भूमिकेत म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीदरम्यान संविधान, लोकशाही आणि आरक्षण वाचविण्याच्या नावाखाली भाजपविरोधी मतदानाचे आवाहन करणाऱ्या अनेक पत्रकार, विश्लेषक आणि विचारवंतांनी जनतेसमोर विशिष्ट राजकीय भूमिका मांडली होती. मात्र, आता त्याच राजकीय पक्षांमधील अनेक नेते भाजपच्या मित्रपक्षांमध्ये सामील होत असल्याचे चित्र दिसत आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या या भूमिकेमुळे राज्यातील विरोधी राजकारण, महाविकास आघाडीची विश्वासार्हता, तसेच लोकसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणांबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः विरोधी पक्षांच्या नेत्यांचे पक्षांतर, क्रॉस-व्होटिंगच्या घटना आणि राजकीय निष्ठा यावरून राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण निर्माण झाले आहे.

२०२४ च्या निवडणुकी दरम्यान अनेक पत्रकार, तथाकथित विचारवंतांनी जाहीरपणे वंचित बहुजन आघाडीला मतदान न करता महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन जनतेला केला होते, तीच सर्व खासदार आता भाजपप्रणीत शिंदेंसेनेत गेली आहेत.  दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने मांडलेल्या भूमिकेमुळे फुले-शाहू-आंबेडकरवादी राजकारणाच्या वर्तुळात नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.

Tags: Dr Babasaheb AmbedkarEknath ShindeMaharashtraMVAPoliticalVanchit Bahujan AaghadiVoting
Previous Post

रविदासिया धर्म संघटनेचे सुखदेव महाराज यांचे निधन; ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून भावपूर्ण आदरांजली

Next Post

नवी मुंबई महापालिकेतील मागासवर्गीय अधिकाऱ्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्याची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे आयुक्तांना निवेदन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home