Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

भव्य सभासद नोंदणी अभियान २०२६; उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये वंचितचा झंझावात

mosami kewat by mosami kewat
July 9, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
भव्य सभासद नोंदणी अभियान २०२६; उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये वंचितचा झंझावात
       
उल्हासनगर : वंचित बहुजन आघाडीच्या राज्यव्यापी महा-सभासद नोंदणी अभियानाला ठाणे जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत असून, जिल्हाध्यक्ष मनोज पवार यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर येथे भव्य सभासद नोंदणी अभियान राबविण्यात आले.

या अभियानासाठी आकर्षक टेंट उभारून नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली होती. वसाहतींमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सभासद नोंदणी केली. विशेषतः महिलांचा सहभाग लक्षणीय होता. अनेक भगिनींनी उपस्थित राहून वंचित बहुजन आघाडीचे सभासदत्व स्वीकारले.

याशिवाय युवक आणि पुरुषांनीही अभियानाला मोठा पाठिंबा दर्शवत परिवर्तनाच्या विचारांवर विश्वास व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी केलेल्या नियोजनबद्ध आणि अथक परिश्रमामुळे संपूर्ण अभियानाला उत्सवी वातावरण लाभले.

यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज पवार यांनी ठाणे जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यासाठी अशा सभासद नोंदणी मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमधील नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

राज्यभर सुरू असलेल्या महा-सभासद नोंदणी अभियानामुळे वंचित बहुजन आघाडीच्या संघटन विस्ताराला गती मिळत असून, ठाणे जिल्ह्यात या अभियानाला मिळालेला प्रतिसाद परिवर्तनाच्या राजकारणाला बळ देणारा असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Tags: MaharashtraPoliticalUlhasnagarVanchit Bahujan Aghadi
Previous Post

Ashadhi Wari 2026: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, ‘हे’ प्रमुख रस्ते राहणार बंद

Next Post

जलकुंभातील गळती तातडीने थांबवा, दूषित पाणीपुरवठा बंद करा; वंचित बहुजन आघाडीची आयुक्तांकडे मागणी

Next Post
जलकुंभातील गळती तातडीने थांबवा, दूषित पाणीपुरवठा बंद करा; वंचित बहुजन आघाडीची आयुक्तांकडे मागणी

जलकुंभातील गळती तातडीने थांबवा, दूषित पाणीपुरवठा बंद करा; वंचित बहुजन आघाडीची आयुक्तांकडे मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा
बातमी

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

by mosami kewat
September 29, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित करण्यात आलेल्या इराण...

Read moreDetails
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

September 29, 2026
मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

September 29, 2026
शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 29, 2026
रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

September 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home