Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Ashadhi Wari 2026: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, ‘हे’ प्रमुख रस्ते राहणार बंद

mosami kewat by mosami kewat
July 9, 2026
in बातमी, सामाजिक
0
Ashadhi Wari 2026: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, ‘हे’ प्रमुख रस्ते राहणार बंद
       

पुणे : संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे ९ जुलै रोजी पुण्यात आगमन होत आहे. आषाढी वारीनिमित्त या दोन्ही पालख्या शहरातून मार्गक्रमण करणार असल्याने, पुणे शहर वाहतूक पोलिसांनी भाविकांची सुरक्षा आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दोन दिवसांचा विशेष वाहतूक आराखडा लागू केला आहे.

​या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. पालखी मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवणे, भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि शहरातील वाहतुकीवरील ताण कमी करणे हा या नियोजनाचा मुख्य उद्देश आहे.

मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार लागू करण्यात आलेल्या या नियोजनादरम्यान अत्यावश्यक सेवांमधील वाहनांना निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे. अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका, पेट्रोल-डिझेल वाहतूक करणारी वाहने तसेच विवाह समारंभासाठी वापरली जाणारी वाहने नेहमीप्रमाणे मार्गक्रमण करू शकतील.

पालखी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक पुण्यात दाखल होणार असल्याने समर्थ वाहतूक विभागाच्या कार्यक्षेत्रात विशेष वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि भाविकांनी आपली वाहने केवळ प्रशासनाने निश्चित केलेल्या अधिकृत पार्किंग ठिकाणीच उभी करावीत, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

दरवर्षीच्या परंपरेनुसार श्री ज्ञानेश्वर महाराज आणि श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या जुन्या मुंबई–पुणे महामार्गावर एकत्र येतात. नरवीर तानाजी वाडी (वाकडेवाडी) आणि पाटील इस्टेट येथून शहरात प्रवेश केल्यानंतर शिवाजीनगर, संचेती रुग्णालय, गणेशखिंड रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन) रस्ता, डेक्कन जिमखाना, खंडोजीबाबा चौक, टिळक चौक आणि लक्ष्मी रस्ता या प्रमुख मार्गांवरून पालखी सोहळा पुढे मार्गक्रमण करणार आहे. यावर्षी श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात गुरुवारी मुक्कामी राहणार असून, श्री तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील श्री निवंडुग्या विठोबा मंदिरात मुक्कामी विसावणार आहे.

नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून करण्यात आलेले प्रमुख बदल खालीलप्रमाणे आहेत:

पालखी सोहळ्यानिमित्त बंद असलेले रस्ते (पहाटे 3 ते रात्री 8 पर्यंत)

– बोपखेल फाटा ते विश्रांतवाडी (पर्यायी रस्ता धानोरी रस्ता, अंतर्गत रस्ते)

– प्रादेशिक मनोरुग्णालय ते आळंदी रस्ता चौक (पर्यायी रस्ता येरवडा कारागृह रस्ता, विमानतळ रस्ता)

– सादलबाबा चौक ते पाटील इस्टेट (पर्यायी रस्ता पर्णकुटी चौक, मंगलदास चौक, आरटीओ चौक)

– नवीन आंबेडकर सेतू ते चंद्रमा चौक वाहतूक बंद

– बोपोडी चौक ते चर्च चौक (पर्यायी रस्ता बोपोडीतील भाऊ पाटील रस्ता, ब्रेमेन चौक, औंध रस्ता)

– पोल्ट्री फार्म चौक, औंध, बालेवाडी मार्ग (पर्यायी रस्ता रेल्वे पोलीस मुख्यालय, ब्रेमेन चौक)

– पिंपरी-चिंचवडमार्गे पुणे शहरात येणारी वाहतूक (भाऊ पाटील रस्ता, ब्रेमेन चौक)

– शादलबाबा दर्गा, येरवडा ते पाटील इस्टेट, वाकडेवाडी, अभियांत्रिकी महाविद्यालय

– होळकर पूल ते चंद्रमा चौक, होळकर पूल ते साप्रस चौकी वाहतूक बंद

अभियांत्रिकी महाविद्यालय ते श्री संत तुकाराम पादुका चौक (सकाळी ८ ते रात्री ११)

– रेंजहिल चौक ते संचेती चौक (पर्यायी रस्ता रेंजहिल, सेनापती बापट रस्ता, नळस्टॉप चौक)

– खंडोजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक (पर्यायी रस्ता कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, रेंजहिल)

– गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे चौक (पर्यायी रस्ता कुंभारवेस चौक, आरटीओ चौक)

श्री तुकाराम पादुका चौक ते बेलबाग चौक (दुपारी १२ ते रात्री ११)

– फर्ग्युसन रस्ता ते टिळक रस्ता

– डेक्कन ते कोथरूड, वारजे, सिंहगड रस्ता

– लक्ष्मी रस्ता ते बेलबाग चौक ते टिळक चौक

– शनिपार चौक ते सेवासदन चौक

– छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, गाडगीळ पुतळा चौक

– जिजामाता चौक ते बुधवार चौक

– नेहरु चौक ते सोन्यामारुती चौक

बेलबाग चौक ते निवडुंगा विठोबा चौक, पालखी विठोबा मंदिर (दुपारी २ ते रात्री १२)

– लक्ष्मी रस्ता, बेलबाग चौक ते सेवासदन चौक

– छत्रपती शिवाजी महाराज रस्ता ते जिजामाता चौक, बुधवार चौक ते बेलबाग चौक

– लक्ष्मी रस्ता ते बेलबाग चौक

– देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक

– सोमवार पेठ पोलीस चौकी ते डुल्या मारुती चौक

रामोशी गेट ते पालखी विठोबा मंदिर, संत कबीर चौक ते चाचा हलवाई चौक

पोलिसांच्या सूचना

– पालखी मार्ग, तसेच लगतच्या मार्गावर १०० मीटर अंतरापर्यंत वाहने लावण्यास मनाई

– पालख्या मार्गस्थ झाल्यानंतर रस्ते टप्याटप्याने खुले

– पालखी मुक्कामी आल्यानंतर नाना-भवानी पेठेत वाहतूक बदल

– आवश्यकतेनुसार टिळक चौक ते बेलबाग चौक, लक्ष्मी रस्ता, फर्ग्युसन रस्ता

– परिसरात एकेरी वाहतुकीचे निर्बंध तात्पुरते शिथिल

– पालखी आगमनाच्या दिवशी आळंदी रस्ता, मुंबई-पुणे रस्त्यावर पेट्रोल, डिझेल टँकरवर बंदी

– वाहतूक शाखा मुख्य नियंत्रण कक्ष क्रमांक (०२०-२६६८५०००, २६६८४०००)

– परगावाहून येणाऱ्या वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Ashadhi Wari 2026: Major Traffic Diversions in Pune for Sant Tukaram Maharaj Palkhi Procession; Key Roads to Remain Closed


       
Tags: Ashadhi WariAshadhi Wari 2026MaharashtrapandharpurpunePune trafficSant DnyaneshwarSant Tukaram Maharajwariपुणे
Previous Post

माळशिरसमध्ये शेतात काम करणाऱ्या दलित महिला मजुराची गोळी झाडून हत्या ; राज्यभरात तीव्र संताप

Next Post

भव्य सभासद नोंदणी अभियान २०२६; उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये वंचितचा झंझावात

Next Post
भव्य सभासद नोंदणी अभियान २०२६; उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये वंचितचा झंझावात

भव्य सभासद नोंदणी अभियान २०२६; उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये वंचितचा झंझावात

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
प्रामाणिकपणाबद्दल व्यापारी मोहम्मद अखीम मोहम्मद जय्युम यांचा समाजरत्न अनिल कांबळे यांच्या हस्ते सत्कार
बातमी

प्रामाणिकपणाबद्दल व्यापारी मोहम्मद अखीम मोहम्मद जय्युम यांचा समाजरत्न अनिल कांबळे यांच्या हस्ते सत्कार

by mosami kewat
August 18, 2026
0

२४ तोळ्यांचे चांदीचे कडे परत करून जपली माणुसकी; प्रामाणिकपणाचा आदर्श समाजासमोर हिंगोली : समाजात स्वार्थ, फसवणूक आणि गैरप्रकारांचा सुळसुळाट होत...

Read moreDetails
‘मी राजगृहातील रमाई बोलतेय’ हा केवळ प्रयोग नव्हे तर वैचारिक प्रबोधन : प्रा. दिलिप महालिंगे

‘मी राजगृहातील रमाई बोलतेय’ हा केवळ प्रयोग नव्हे तर वैचारिक प्रबोधन : प्रा. दिलिप महालिंगे

August 18, 2026
राष्ट्रीय सुरक्षेची फजिती: अपयश, हितसंबंध आणि दुहेरी मापदंड

राष्ट्रीय सुरक्षेची फजिती: अपयश, हितसंबंध आणि दुहेरी मापदंड

August 18, 2026
नवी मुंबईत SIR प्रक्रियेसंदर्भात व्हीबीए (VBA) पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांशी चर्चा

नवी मुंबईत SIR प्रक्रियेसंदर्भात व्हीबीए (VBA) पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांशी चर्चा

August 18, 2026
साईनगर, रबाळे परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा; वंचित बहुजन आघाडीकडून महापालिका प्रशासनाला जाब

प्रत्येक अडचणीत वंचित बहुजन आघाडी नागरिकांच्या मदतीला; साईनगर रबाळेतील समस्यांवर प्रशासनाला इशारा

August 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home