Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

माळशिरसमध्ये शेतात काम करणाऱ्या दलित महिला मजुराची गोळी झाडून हत्या ; राज्यभरात तीव्र संताप

mosami kewat by mosami kewat
July 9, 2026
in बातमी, राजकीय
0
माळशिरसमध्ये शेतात काम करणाऱ्या दलित महिला मजुराची गोळी झाडून हत्या ; राज्यभरात तीव्र संताप
       
माळशिरस : तालुक्यातील चौंडेश्वरवाडी येथे शेतात मजुरीचे काम करणाऱ्या उषा साठे या अनुसूचित जातीतील महिला मजुराची गोळी झाडून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले असून परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. 

मृत उषा साठे यांचे कुटुंब मूळचे माळखांबी गावचे असून,  मागील १० वर्षांपासून आरोपी सचिन देशमुख याच्याकडे मजुरीचे काम करत होत्या. आरोपीने आर्थिक आणि जातीय मानसिकतेतून एका गरीब महिलेचा बळी घेतल्याचे बोलले जात आहे.  दलित महिलांवर होणाऱ्या या अत्याचाराबाबत शासन आणि मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमे उदासीन असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या अमानुष घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून पीडित कुटुंबाला तातडीने न्याय देण्याची मागणी जोर धरत आहे. नसरापूर घटनेच्या धर्तीवर हा खटला चालवून ५० दिवसांच्या आत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी शासनाने सक्षम सरकारी वकील नेमावा अशी मागणी केली जात आहे. 

तसेच, आरोपीने हे शस्त्र कुठून आणले आणि या हत्येच्या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकाद्वारे (SIT) चौकशी करून आरोपीची संपत्ती जप्त करण्याची मागणीही करण्यात येत आहे. 

माळशिरस हा राखीव मतदारसंघ असूनही स्थानिक आमदारांनी अद्याप पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणाचा सर्व स्तरांतून तीव्र निषेध केला जात असून, पीडित कुटुंबाला तात्काळ कायदेशीर न्याय मिळण्याची प्रतीक्षा आहे.

Tags: crimeFarm workerMaharashtraMalshiras
Previous Post

परळी तालुक्यातील जिरेवाडी येथे राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप

Next Post

Ashadhi Wari 2026: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, ‘हे’ प्रमुख रस्ते राहणार बंद

Next Post
Ashadhi Wari 2026: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, ‘हे’ प्रमुख रस्ते राहणार बंद

Ashadhi Wari 2026: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा
बातमी

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

by mosami kewat
September 29, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित करण्यात आलेल्या इराण...

Read moreDetails
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

September 29, 2026
मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

September 29, 2026
शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 29, 2026
रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

September 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home