Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

प्रत्येक अडचणीत वंचित बहुजन आघाडी नागरिकांच्या मदतीला; साईनगर रबाळेतील समस्यांवर प्रशासनाला इशारा

mosami kewat by mosami kewat
August 18, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
साईनगर, रबाळे परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा; वंचित बहुजन आघाडीकडून महापालिका प्रशासनाला जाब

साईनगर, रबाळे परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा; वंचित बहुजन आघाडीकडून महापालिका प्रशासनाला जाब

नवी मुंबई : साईनगर, रबाळे परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांची दखल घेत वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. परिसरातील कार्यकर्त्यांनी नवी मुंबई महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

पाहणीदरम्यान परिसरातील नागरिकांच्या घरांसमोर तुटलेली गटारे, खराब रस्ते, रस्त्यावर वाहणारे सांडपाणी, नियमितपणे न उचलला जाणारा कचरा तसेच भटक्या जनावरांमुळे निर्माण झालेली अस्वच्छता यांसह अनेक समस्या निदर्शनास आल्या. या परिस्थितीमुळे नागरिकांना घराबाहेर पडताना तसेच ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे यावेळी समोर आले. तेथील परिस्थितीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून, परिसरातील मूलभूत सोयी-सुविधा अक्षरशः वाऱ्यावर असल्याचे पाहणीतून दिसून आले.

Also Read : अशोक चव्हाण जर उद्या भाजपमधून काँग्रेसमध्ये येतो म्हणाले… तर काँग्रेस त्यांना नाकारेल का?

या समस्यांची पाहणी केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे यांनी महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसतील तर प्रशासन नेमके कोणासाठी काम करत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

परिसरातील या सर्व समस्या तातडीने सोडविण्यात आल्या नाहीत, तर घणसोली वॉर्ड कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मल्लिनाथ सोनकांबळे यांनी दिला. यावेळी ऐरोली तालुका सचिव आकाश भारदे, रबाळे विभाग उपाध्यक्ष राजाराम गाडे, लक्ष्मण सूर्यवंशी, पिराजी दांडगे, अंकुश तेलंगे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. जोपर्यंत नागरिकांच्या समस्या सुटत नाहीत, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा संघर्ष सुरूच राहील,” अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केली.

Tags: Ghansoli Ward OfficeMaharashtranavi mumbaiVanchit Bahujan AaghadiVBA Protests Civic Neglect in Sainagar-Rabale
Previous Post

अशोक चव्हाण जर उद्या भाजपमधून काँग्रेसमध्ये येतो म्हणाले… तर काँग्रेस त्यांना नाकारेल का?

Next Post

नवी मुंबईत SIR प्रक्रियेसंदर्भात व्हीबीए (VBA) पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांशी चर्चा

Next Post
नवी मुंबईत SIR प्रक्रियेसंदर्भात व्हीबीए (VBA) पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांशी चर्चा

नवी मुंबईत SIR प्रक्रियेसंदर्भात व्हीबीए (VBA) पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांशी चर्चा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुण्यात २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक!
बातमी

पुण्यात २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक!

by mosami kewat
September 28, 2026
0

सातारा : वंचित बहुजन आघाडीच्या पुणे विभागीय संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी २ ऑक्टोबर २०२६ रोजी सातारा येथे विभागीय आढावा...

Read moreDetails
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन खर्चन (नाना) यांचे निधन; वंचित बहुजन आघाडीकडून भावपूर्ण श्रद्धांजली

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन खर्चन (नाना) यांचे निधन; वंचित बहुजन आघाडीकडून भावपूर्ण श्रद्धांजली

September 28, 2026
लातूरमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीचा झंझावात; शेकडो मुस्लिम व बहुजन तरुणांचा पक्षप्रवेश

लातूरमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीचा झंझावात; शेकडो मुस्लिम व बहुजन तरुणांचा पक्षप्रवेश

September 28, 2026
वर्धेत विद्यार्थ्यांचा एल्गार! हिंदी विद्यापीठावर सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात ‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’

वर्धेत विद्यार्थ्यांचा एल्गार! हिंदी विद्यापीठावर सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात ‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’

September 28, 2026
‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’: सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात उद्या वर्धेत महात्मा गांधी हिंदी विद्यापीठावर धडक

‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’: सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात उद्या वर्धेत महात्मा गांधी हिंदी विद्यापीठावर धडक

September 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home