Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘मी राजगृहातील रमाई बोलतेय’ हा केवळ प्रयोग नव्हे तर वैचारिक प्रबोधन : प्रा. दिलिप महालिंगे

mosami kewat by mosami kewat
August 18, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
‘मी राजगृहातील रमाई बोलतेय’ हा केवळ प्रयोग नव्हे तर वैचारिक प्रबोधन : प्रा. दिलिप महालिंगे
       
औरंगाबाद: ‘मी राजगृहातील रमाई बोलतेय’ हा केवळ प्रयोग नव्हे तर वैचारिक प्रबोधन असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रा. दिलीप महालिंगे यांनी केले. ते रमाई फाऊंडेशन, रमाई मासिक, रमाई प्रकाशन आणि लोकनेते भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठान, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती आणि भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात ‘मी राजगृहातील रमाई बोलतेय’ या एकपात्री प्रयोगासह ‘तरी आम्ही बोलू नये’ या वैचारिक काव्यमय कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते. 

या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रा. दिलीप महालिंगे यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी ख्यातनाम साहित्यिक व विचारवंत प्राचार्य डॉ. संजय मून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमाई फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा रमाई मासिकाच्या संपादक प्रा. डॉ. रेखा मेश्राम यांनी केले.

प्रा. रमणी बबिता आकाश (पुणे) यांनी ‘मी राजगृहातील रमाई बोलतेय’ या एकपात्री प्रयोगातून उपस्थितांची मने जिंकली. तसेच ‘तरी आम्ही बोलू नये’ या वैचारिक काव्यमय कार्यक्रमात प्रा. रमणी बबिता आकाश, श्रेया वाघ, अनिशा दोडके, जित्या जाली, किरण प्रकाश, स्वराज समदूर, विजय लोखंडे, प्रशिक तायडे, किशोर चक्रनारायण, सुमेध वंदना मधुकर, सुभाष गवळी आणि शुभम आव्हाळे यांनी आपापल्या कवितांमधून समाजमनाला जागृत केले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विजयकुमार गवई ॲड एस आर बोडदे , प्राचार्य सुनिल वाकेकर, प्राचार्य डॉ. यशवंत खडसे, डॉ धनराज गोंडाने, स सो खंडाळकर, रतनकुमार साळवे, ऍड जे के नारायणे व्ही के वाघ, यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दैवतीला गवंदे, राजकन्या गोंडाणे, डॉ. वंदना पाटील, शारदा पगारे रत्नकला बनसोडे, संघमित्रा खंडाळकर, सविता अभ्यंकर, सरला सदावर्ते, गंगाबाई सुरडकर, यांनी परिश्रम घेतले.

Tags: aurangabadDr Babasaheb AmbedkarMaharashtraMata ramaiMi Rajgrihatil Ramai BolteyPolitical
Previous Post

राष्ट्रीय सुरक्षेची फजिती: अपयश, हितसंबंध आणि दुहेरी मापदंड

Next Post

प्रामाणिकपणाबद्दल व्यापारी मोहम्मद अखीम मोहम्मद जय्युम यांचा समाजरत्न अनिल कांबळे यांच्या हस्ते सत्कार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tiger Shroff : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार; दोन जण जखमी
बातमी

Tiger Shroff : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार; दोन जण जखमी

by mosami kewat
October 18, 2026
0

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुहू येथील पुष्पा पार्क परिसरात ही...

Read moreDetails
साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन करणाऱ्या आई-वडिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या हस्तक्षेपानंतर सुटका

साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन करणाऱ्या आई-वडिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या हस्तक्षेपानंतर सुटका

October 18, 2026
आझाद समाज पार्टीला नाशिकमध्ये खिंडार! जिल्हाध्यक्ष साहिल सोनवणे संपूर्ण संघटनेसह वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर!

आझाद समाज पार्टीला नाशिकमध्ये खिंडार! जिल्हाध्यक्ष साहिल सोनवणे संपूर्ण संघटनेसह वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर!

October 18, 2026
ग्वाल्हेरमध्ये भीषण अपघात!  ट्रकच्या धडकेत १४ भाविक ठार, २९ जण जखमी

ग्वाल्हेरमध्ये भीषण अपघात!  ट्रकच्या धडकेत १४ भाविक ठार, २९ जण जखमी

October 18, 2026
कोलकाता हादरले! चोरबागान दुर्गा पूजा मंडपात सप्तमीच्या संध्याकाळी चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर

कोलकाता हादरले! चोरबागान दुर्गा पूजा मंडपात सप्तमीच्या संध्याकाळी चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर

October 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home