लातूर : वंचित बहुजन आघाडीच्या रेणापूर तालुका कार्यकारिणीची बैठक व्हटी (ता. रेणापूर) येथे पक्षाचे ज्येष्ठ मार्गदर्शक धोंडीराम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत सदस्य नोंदणी मोहिम, युवा व महिला आघाडीच्या शाखा स्थापन करणे, प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बुथ एजंट नेमणे तसेच तालुक्याच्या विस्तारित कार्यकारिणीत गावागावातून दोन प्रतिनिधींचा समावेश करण्याचे ठरविण्यात आले. तसेच विविध शाखांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत प्राथमिक चर्चा झाली.
तालुकाध्यक्ष रतन आचार्य यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “देशाचे संविधान आणि लोकशाही वाचविण्याची ताकद फक्त अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यात आहे. अन्याय-अत्याचाराविरोधातील लढाई न्यायालयात असो वा रस्त्यावर, ती त्यांनी यशस्वीरीत्या लढवली आहे.
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील विजय हेच त्याचे उदाहरण आहे. आगामी ग्रामपंचायत, नगरपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांत पक्षाचे उमेदवार विजयी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे.” असे त्यांनी आवाहन केले.
बैठकीचे अध्यक्ष धोंडीराम गायकवाड यांनीही पक्ष बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीस कृष्ण वाघमारे, अतुल कांबळे, तालुका सचिव सम्राट गौतम गोडबोले यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन संघर्ष चिकटे यांनी केले तर आभार प्रदर्शन सूरज रमेश गायकवाड यांनी मानले.
Dhamma Chakra Pravartan Din 2025 : मोदींना टाटा, बाय बाय करा आणि देश वाचवा; ओबीसी समाजाने वेळीच सावध व्हावे – ॲड. प्रकाश आंबेडकर
अकोल्यात धम्म मेळाव्याला उसळला जनसागर अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म मेळाव्यात वंचित बहुजन...
Read moreDetails