लातूर : वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकारिणी, रेणापूरची महत्त्वपूर्ण बैठक तक्षशिला बुद्ध विहार, घनसारगाव येथे पार पडली. या बैठकीत सदस्य नोंदणी, बूथ एजंट नियुक्ती तसेच शाखा स्थापनासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
बैठकीत खालील मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आले :
- वंचित बहुजन आघाडीची सदस्य नोंदणी मोहीम राबविणे.
- परेंट बॉडी, युवा आघाडी व महिला आघाडीच्या शाखा स्थापन करणे.
- प्रत्येक मतदान केंद्रावर (बुथ) दोन मतदान प्रतिनिधी नियुक्त करणे.
- दि. १० व ११ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या “कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर” बाबत व्यापक प्रचार-प्रसार करणे.
बैठकीत निर्णय घेण्यात आला की या शिबिराच्या प्रचारासाठी तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसोबत संवाद दौरा आयोजित केला जाणार आहे. या दौऱ्यात अविनाशजी भोसीकर (प्रदेश सदस्य तथा नांदेड लोकसभा उमेदवार), शुद्धोदन सावंत (लातूर जिल्हा निरीक्षक), सय्यद सलीम (जिल्हाध्यक्ष) यांच्यासह मान्यवर सहभागी होणार आहेत.
तसेच अविनाश भोसीकर यांच्या हस्ते तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटनही होणार असून, हा कार्यक्रम दि. ०८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता राजी, शिवाजी महाविद्यालयाजवळ रेणापूर फाटा रोड, रेणापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
घनसारगाव येथे दोन मतदान केंद्रांवर बूथ एजंट म्हणून किशोर प्रकाश कांबळे, प्रमोद निवृत्ती कांबळे, विश्वनाथ कांबळे आणि आदर्श रमाकांत कांबळे यांची नावे सर्वानुमते निश्चित करण्यात आली. लवकरच आघाडीच्या फादर बॉडी, युवा व महिला आघाडीच्या शाखांची कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल, असे बैठकीत सांगण्यात आले.
बैठकीच्या प्रारंभी महामानवांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून पूजन करण्यात आले.या वेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष रतन आचार्य, भरती बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष सचिन कांबळे, तालुका उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, महासचिव विशाल मस्के, संघटक कृष्ण वाघमारे,
सचिव अतुल कांबळे, सम्राट गोडबाले यांच्यासह गावातील लक्ष्मण कांबळे, राहुल कांबळे, शाहू कांबळे, माधव कांबळे, बालिका कांबळे व अन्य स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माधव कांबळे सर यांनी केले.