Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home article

अर्थव्यवस्थेची विकलांगता आणि ‘युद्ध’ नावाचा कॉर्पोरेट धंदा

mosami kewat by mosami kewat
June 12, 2026
in article, अर्थ विषयक, सामाजिक
0
अर्थव्यवस्थेची विकलांगता आणि 'युद्ध' नावाचा कॉर्पोरेट धंदा

अर्थव्यवस्थेची विकलांगता आणि 'युद्ध' नावाचा कॉर्पोरेट धंदा

       

-संजीव चांदोरकर

अमेरिका -इस्रायल आणि इराण युद्धातून पुन्हा तेच सिद्ध होत आहे की लाखो / कोटी डॉलर्स खर्चून महाकाय लष्करी ताकद वापरून दादा राष्ट्रे तुलनेने लष्करी दृष्टया कमकुवत असणाऱ्या राष्ट्रांना गुडघ्यावर आणू शकत नाहीत

जगातील महासंहारक लष्करी सामर्थ्य असणाऱ्या आणि निर्दयी इतिहास असणाऱ्या अमेरिका / इस्रायल यांनी इराणवर लादलेल्या युद्धातून नक्की निष्पन्न होणार हे काळच ठरवेल ; पण गेल्या साडे तीन महिन्यानंतर वरील गोष्ट मात्र अधोरेखित झाली आहे.

२०२५ सालात अमेरिकेने संरक्षण सिद्धतेवर ९५४ बिलियन्स डॉलर्स खर्च केले , तर इस्रायलने ४८ बिलियन डॉलर्स ; म्हणजे दोघांचे झाले जवळपास १००० बिलियन्स डॉलर्स / किंवा एक ट्रिलियन्स डॉलर्स

त्या तुलनेत इराणचा संरक्षण सिद्धतेवरील खर्च होता (होल्ड युअर ब्रीद !) ७.५ (साडेसात) बिलियन डॉलर्स ; म्हणजे अमेरिका प्लस इस्रायलच्या फक्त शून्य पूर्णांक सात (०.७) टक्के. (यात चीन रशिया कडून गेलेल्या लष्करी मदतीचा समावेश नाही हे खरे )

गेल्या १०० दिवसात अमेरिकेने ४० ते ५० बिलियन डॉलर्स खर्च केले आहेत ; इस्रायलचा झालेला खर्च वेगळाच ! आणि या दिवसातील युद्धाचा आउटकम आपल्या सर्वांच्या समोर आहे

Stockholm International Peace Research Institute (SIPRI) सिप्रि ही स्वीडिश संस्था जगातील शस्त्रात्र निर्मिती क्षेत्रातील घडामोडी, आकडेवारी यांचा मागोवा ठेवते. त्यांचा २०२५ सालसाठीचा अहवाल अलीकडेच प्रसिद्ध झाला

२०२५ या वर्षात जगातील सर्व देशांनी मिळून २७०० बिलियन डॉलर्स. त्यातील एक तृतीयांश एकटी अमेरिका खर्च करते ; ट्रम्प प्रशासनाने पुढच्या वर्षासाठी तर १५०० बिलियन्स डॉलर्स संरक्षण खर्चचा प्रस्ताव काँग्रेससमोर ठेवला आहे.

सिप्री असे नमूद करते की फक्त संरक्षण सिद्धतेवर अमाप पैसे खर्च करून एखादा बलदंड देश त्यांच्या तथाकथित शत्रूला हवातसा धडा शिकवून , डोकेदुखी कायमची संपवू शकत नाही.

उदा चीन ३३६ बिलियन्स डॉलर्स खर्च करते तर तैवान फक्त १८ बिलियन्स डॉलर्स ; भारत ९२ बिलियन्स डॉलर्स तर पाकिस्तान फक्त १२ बिलियन्स डॉलर्स खर्च करते ; त्याशिवाय रशिया, युक्रेन आहेच.

सिप्री असे सुचवू इच्छिते की संरक्षण सिद्धतेवरील खूप खर्च म्हणजे खूप लष्करी प्रभाव पाडण्याची क्षमता असे समीकरण बसवता येत नाही. देशाकडे इतर बऱ्याच गोष्टी असाव्या लागतात.

उदा. सौदी अरेबिया ८५ बिलियन डॉलर्स खर्च करून जगात आठव्या क्रमांकावर आहे. तो जगातील सर्वात मोठा युद्ध सामुग्रीचा आयातदार देश आहे. पण त्याची लष्करी प्रभाव पाडण्याची क्षमता कमकुवत आहे

दुसरा मुद्दा. संरक्षण सिद्धतेसाठी किती अर्थसंकल्पीय तरतूदी वाढवत नेणार याला मर्यादा आहेत. संरक्षण खर्चाच्या पोहऱ्यात पाणी ओढून घेण्यासाठी अर्थव्यस्वस्थेच्या विहिरीत पाणी तयार तर झाले पाहिजे ! उदा. युक्रेन गेली काही वर्षे जीडीपीच्या ४० टक्के संरक्षण सिद्धतेवर खर्च करत आहे. त्यामुळे उत्पादक अर्थव्यवस्था विकलांग होते. भविष्यात संरक्षण खर्च करणार तरी कसा

इतिहासातून आलेले सगळे शहाणपण एक ओपन बुक आहे. तरी देखील भविष्यात जगातील संरक्षण सिद्धतेवरील खर्च वाढतच जाणार आहेत.

अमेरिका आपला खर्च पन्नास टक्के वाढवणार आहे. नाटो गटातर्फे मिळणारे संरक्षण कमी होणार असल्यामुळे अनेक युरोपियन युनियन सभासद राष्ट्रे खर्च वाढवणार आहेत. जेवढे भू राजनैतिक ताणतणाव वाढतील त्या प्रमाणात खर्च वाढणार. ते क्रिया प्रतिक्रिया साखळीने वाढतात. शत्रू राष्ट्रात एकप्रकारची शस्त्रास्त्र स्पर्धा होतेच होते.

हे झाले संरक्षण खर्चाचे आकडे. जीवित हानी , कायमचे विकलांग झालेले सैनिक आणि नागरिक, आणि मरेपर्यंत राहणारे मानसिक रुग्ण , सर्व प्रकारच्या पायभूत सुविधा , घरे, घरातील सामान, ….कोण काढणार यांचे मूल्य.

अनेक राष्ट्रात अतिरेकी राष्ट्रवाद विचारसरणी मानणारे राज्यकर्ते सत्तेवर येत आहेत. भविष्यात अजून देश त्या रंगात न्हाऊन निघतील असे अंदाज आहेत. संरक्षण सिद्धत्तेवर आम्ही जास्तीत जास्त खर्च करतो हे देशप्रेम सिद्ध करण्याचे आणि राजकीय विरोधकांपेक्षा आम्ही अधिक देशप्रेमी आहोत हे दाखवण्याचे हत्यार बनत चालले आहे

आपल्याला वाटते तसे हे सरळमार्गी देखील नाही.

यातून जगातील मोजक्या देशातील संरक्षण सामुग्री उद्योगांना प्रचंड धंदा / नफा मिळतो. त्यांनी देणग्या दिलेले थिंक टँक्स , लॉबीज सतत कार्यरत असतात. सर्व प्रकारच्या मीडियामधून द्वेष , भय पेरत राहतात. आपल्याला कल्पना देखील नाही.

कल्पना करा. हायपोथेटिकली जगातील सर्व युद्धे थांबली. तर ? कोणत्या उद्योगाचे दुकान सर्वात आधी बंद होईल ?

तरुण पिढीसाठी. आपण हा काही हॉलिवूडचा भयपट डिस्कस करत नाही आहोत. युद्ध ? …ओके..ते अधिकारी आणि सैनिक काय ते बघून घेतील. असे ते नाहीये. तुमच्या, तुमच्या मुलाबाळांच्या पर्यंत येणारे आहे सगळे.


       
Tags: Defense SpendingGDP and Defense BudgetGeopoliticsGlobal Military ExpenditureMilitary-Industrial ComplexSIPRI ReportWar Economics
Previous Post

मोदी अजून किती काळ ट्रम्पच्या तालावर मुजरा करणार ? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर निशाणा !

Next Post

‘ अमेरिकेत तीन भारतीय मारले गेले, मोदी गप्प का? ‘ प्रकाश आंबेडकरांचा सवाल

Next Post
' अमेरिकेत तीन भारतीय मारले गेले, मोदी गप्प का? ' प्रकाश आंबेडकरांचा सवाल

' अमेरिकेत तीन भारतीय मारले गेले, मोदी गप्प का? ' प्रकाश आंबेडकरांचा सवाल

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home