Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सलीम अली सरोवराच्या सुशोभीकरणासाठी महापौर-आयुक्तांची पाहणी; जावेद कुरेशी यांच्या प्रयत्नांना यश

mosami kewat by mosami kewat
September 21, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
सलीम अली सरोवराच्या सुशोभीकरणासाठी महापौर-आयुक्तांची पाहणी; जावेद कुरेशी यांच्या प्रयत्नांना यश
       
औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक जनाब जावेद कुरेशी यांच्या प्रयत्नातून शहरातील ऐतिहासिक डॉ. सलीम अली सरोवराच्या सुशोभीकरण प्रकल्पाला चालना मिळाली आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने शहराचे महापौर समीर राजूरकर आणि महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी आज सलीम अली सरोवराला विशेष भेट देत पाहणी केली.

या भेटीदरम्यान सरोवराच्या सुशोभीकरणासाठी आवश्यक उपाययोजना, विकासकामे आणि प्रकल्पाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. महापौर समीर राजूरकर आणि आयुक्त अमोल येडगे यांनी या प्रकल्पासाठी महानगरपालिकेकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच सलीम अली सरोवराला शहरातील सर्वात सुंदर तलाव बनविण्यासाठी प्रयत्न करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या पाहणीवेळी वंचित बहुजन आघाडीचे गटनेते अफसर खान, स्थायी समिती सदस्य अमित भुईगळ तसेच झोन क्र. १ च्या सभापती करुणा मेघानंद जाधव यांच्यासह संबंधित पदाधिकारी उपस्थित होते. सलीम अली सरोवराच्या सुशोभीकरणामुळे परिसराच्या विकासाला चालना मिळण्यासोबतच नागरिकांसाठी अधिक चांगले पर्यटन व विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Tags: aurangabadMaharashtraPoliticalSalim Ali LakeSalim Ali Lake Beautification ProjectVanchit Bahujan Aghadi
Previous Post

आयआयटी मुंबई हे दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे केंद्र बनले आहे – सुजात आंबेडकर 

Next Post

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !

Next Post
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home