Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !

mosami kewat by mosami kewat
September 21, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !
       

– संजीव चांदोरकर

वित्त भांडवलाच्या युगात, स्थापनेनंतर फक्त २५ वर्षाच्या कालावधीत पूर्ण देशभर फूटप्रिंट असणारा भागभांडवलाचा पंथ (  इक्विटी कल्ट)  तयार करणारे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE ; एनएसइ) !   

एनसीई भारतातीलच नाही तर जगातील एक अग्रगण्य, अद्ययावत नव तंत्रज्ञानावर आधारित स्टॉक एक्सचेंज आहे. देशातील कॅश सेगमेंटच्या ९० टक्के, फ्युचर्स ट्रेडिंगच्या १०० टक्के आणि ऑप्शन्स ट्रेडिंगच्या ७० टक्के वाटा एनएसई चा आहे. या संस्थेचा देशातील भांडवल बाजारात असणारा दरारा लक्षात यायला वरील आकडेवारी पुरेशी आहे. 

१७००-१७८५ रुपये प्रति शेयर या रेंज मध्ये एनएसई तब्बल २२,५६२ कोटी रुपयांची भांडवल उभारणी भांडवल बाजारातून करत आहे. शेयरच्या या भावाने एनएसईचे बाजारमूल्य अंदाजे साडे चार लाख कोटी रुपये असेल. संपूर्ण इश्यू ऑफर फॉर सेल (OFS) स्वरूपाचा आहे. याचा अर्थ असा की एनएसइचे जे सध्याचे संस्थात्मक गुंतवणूकदार आहेत ते त्यांच्याकडील आधीच भरणा केलेले शेअर्स बाजारात विकणार आहेत. 

जगात आपल्या बीएसई सहित अनेक न्यूयॉर्क, शिकागो स्टॉक मार्केट लिस्टेड आहेत. एनएसई लिस्ट होणे अपवादात्मक नाही.

खरेतर एनएसई कानामागून येऊन, अनेक दशकांच्या गॅप नंतर झालेले (स्थापना १९९२) छोटे भावंड आहे. त्याआधी देशात पंधरा वीस छोटी मध्यम रिजनल स्टॉक मार्केट होती. सर्वात बलाढ्य होते अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. बीएसइ 

दक्षिण मुंबईत १८५० च्या दशकात चक्क एका मोठ्या वडाच्या झाडाखाली आधी पाच आणि नंतर वीस ट्रेडर्सनी एकत्र भेटून अनौपचारिक पद्धतीने स्टॉक्सची खरेदी विक्री करायला सुरुवात केली. नंतर त्याचे औपचारिक संस्थेत रूपांतर झाले १८७५ साली. जे कालांतराने दलाल स्ट्रीटवर बीएसई नावाने विसावले ते आजतागायत. 

हे एक्सचेंज सभासद ब्रोकर्सच्या मालकीचे होते. खरेदी विक्री दररोज दुपारी एका वर्तुळाकार जागेत, ज्याला रिंग म्हणत, तेथे होत असे. त्यात ज्यांच्याकडे लायसेन्स आहे त्या ब्रोकरनी नेमलेले जॉबर जाऊ शकत. ही खरेदी विक्री “आऊट क्राय” पद्धतीने होत असे. म्हणजे जॉबर मोठ्याने ओरडून त्याला कोणता शेयर विकायचा आहे ते ओरडून सांगत…इत्यादी. जुन्या हिंदी सिनेमात अनेकदा याचे सीन आपण बघितलेले आहेत. 

अपेक्षेप्रमाणे या व्यवहारात पारदर्शकतेचा अभाव होता. सर्व व्यवहार , शेयर सर्टिफिकेट कागदी. डिमॅट तंत्रज्ञान अजून जन्मायचे होते. म्हणजे कल्पना करा काय धुमाकुळ सुरु असेल ! ….आणि एप्रिल १९९२ मध्ये हर्षद मेहता घोटाळ्याचा बॉम्बस्फोट झाला. त्या बॉम्बची पिन काढली होती प्रख्यात अर्थ पत्रकार सुचेता दलाल यांनी. (यावर आधारित SCAM नावाची सोनी ओटीटी वर सिरीज जरूर बघा)

हे तेच वर्ष होते जेव्हा देशाची अर्थव्यवस्था परकीय भांडवलासाठी शटर वर करू लागली होती. भांडवल बाजाराच्या विश्वासार्हतेचा प्रश्न होता. बीएसई सुधारणार नव्हती. कारण त्यावर सट्टेबाज दलालांची पकड नव्हे तर मालकी होती. भारतातील Feudal प्रणाली बघून परकीय भांडवल देशाच्या दारात येऊन परत गेले असते. 

रातोरात केंद्र सरकारचा, पॉलिटिकली बोलायचे तर राज्यकर्त्या वर्गाचा, राजकीय निर्णय झाला. निम सरकारी मालकीची , अद्ययावत स्क्रीन बेस्ड पारदर्शी ट्रेडिंग प्रणाली असणारी, कॉर्पोरेट गव्हर्नन्स बाबत जाबदायी असणारे नवीन राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज १९९२ सालात स्थापन केले गेले. (समांतर पद्धतीने त्याच वर्षात आधीच स्थापन झालेल्या “सेबी”ला सेबी कायद्यान्वये घटनात्मक दर्जा दिला गेला ). 

आणि रेस्ट इज हिस्टरी ! 

स्क्रीन बेस्ड ट्रेडिंग , सिस्टीम ड्रिव्हन सेटलमेंट , डिमॅट अकॉऊंट,  इंटरनेट बँकिंग, म्युच्युअल फंड उद्योग अशा अनेक गोष्टींमुळे शेयर मार्केटमधील भारतीय नागरिकांचा आणि अर्थातच परकीय भांडवलाचा सहभाग वाढवत नेला गेला. खरेदी विक्री , सेटलमेंट या संपूर्ण प्रक्रियेत कमीतकमी मानवी हस्तक्षेप हे एनएसीईचे  गाभ्यातील मार्गदर्शक तत्व ठेवले गेले आहे. 

अर्थात देशाच्या भांडवल बाजारात जे काही घडले ते काही एकट्या एनएसीईचे handywork नव्हते. एक संस्थात्मक इकॉलॉजी तयार केली गेली. वर म्हटल्याप्रमाणे हा राजकीय निर्णय होता. जो धीम्या गतीने पण चिकाटीने राबवला गेला. ती प्रक्रिया अजूनही संपलेली नाही. 

आज घडीला एनएसीईची दोन लाखांपेक्षा जास्त टर्मिनल देशभर कार्यरत आहेत. देशाचे जेवढे पिन कोड विभाग आहेत त्यातील जवळपास सर्व पिन कोड आपल्या पत्यावर असणारे १३ कोटी गुंतवणूकदार एनएसीईकडे रजिस्टर आहेत. अर्थात सर्वच्या सर्व सक्रिय नसतात हे उघड आहे. 

एनएसई स्थापन झाल्यावर बीएसइ देखील सुधारली. गैरव्यवहार खचितच कमी झाले हे नाकारता येणार नाही. पण एनएसीई मध्ये Co location सारखा घोटाळा झालाच. जो पुन्हा सुचेता दलाल यांच्या मनिलाइफने उघडकीस आणला आणि लावून धरला.  

भारतातील कॉर्पोरेट आणि वित्त भांडवलशाहीचा मी एक राजकीय टीकाकार आहे आणि राहीन. पण ही प्रणाली राबवण्यासाठी त्याचे खोलीकरण करण्यासाठी ज्या ज्या संस्था, एनएसीई सहित, कार्यरत आहेत, त्यांना उथळ लेबले न लावता त्यांचा राजकीय आर्थिक भिंगातून वस्तुनिष्ठपणे, एक अभ्यासक / विद्यार्थी म्ह्णून, अभ्यास केला पाहिजे असे मला नेहमी वाटते. 

हा / असा अभ्यास काही स्वतःचे ऍकेडेमिक ज्ञान समृद्ध करण्यासाठी नाही. तर भविष्यात पर्यायी जनकेंद्री आर्थिक ढाचे / प्रणाली उभी करण्यासाठी देशातील प्रचलित भांडवली / वित्त प्रणालीचा अभ्यास ही पूर्वअट आहे म्हणून. 

मूलभूत पिंडच अराजकवादी असणाऱ्या (जागतिक) भांडवलशाही प्रणालीने तिला पर्यायी (भांड्वलकेंद्री नव्हे तर जनकेंद्री / पर्यावरणकेंद्री ) मॉडेल उभे न करण्याला पर्यायच ठेवलेला नाही. जे होणार आहे. जगभर त्याचे पडघम ऐकू येऊ लागले आहेत. 


       
Tags: CapitalEconomicsFinancialIPONSE IPOShare market
Previous Post

सलीम अली सरोवराच्या सुशोभीकरणासाठी महापौर-आयुक्तांची पाहणी; जावेद कुरेशी यांच्या प्रयत्नांना यश

Next Post

‘जिथे अन्याय आहे, तिथे ठामपणे पाठीशी उभे राहणे हाच करुणेचा अर्थ’ – अंजलीताई आंबेडकर

Next Post
‘जिथे अन्याय आहे, तिथे ठामपणे पाठीशी उभे राहणे हाच करुणेचा अर्थ’ – अंजलीताई आंबेडकर

‘जिथे अन्याय आहे, तिथे ठामपणे पाठीशी उभे राहणे हाच करुणेचा अर्थ' - अंजलीताई आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home