Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘जिथे अन्याय आहे, तिथे ठामपणे पाठीशी उभे राहणे हाच करुणेचा अर्थ’ – अंजलीताई आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
September 21, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
‘जिथे अन्याय आहे, तिथे ठामपणे पाठीशी उभे राहणे हाच करुणेचा अर्थ’ – अंजलीताई आंबेडकर
       

अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील कवठा शेलू येथे बुद्धमूर्तीची स्थापना वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना करुणा, प्रज्ञा, शिक्षण, सामाजिक न्याय आणि बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या विचारांचे आचरण यावर भाष्य केले.

यावेळी पूज्य भंते राजज्योती, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अरुंधतीताई शिरसाट, अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आम्रपालीताई खंडारे, मूर्तिजापूर तालुकाध्यक्ष सुनील सरदार, महिला आघाडी तालुकाध्यक्ष वानखडेताई, माजी तालुकाध्यक्ष संजय नाईक यांच्यासह बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘करुणा’ म्हणजे केवळ स्वतःपुरते मर्यादित न राहता आपल्या शेजार-पाजारापासून गाव, समाज, देश आणि देशाच्या सीमांपलीकडील सामाजिक प्रश्नांकडेही संवेदनशीलतेने पाहणे होय, असे प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी सांगितले. जिथे अन्याय आणि अत्याचार आहे, तिथे त्या समूहाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून ‘तुम्ही एकटे नाही आहात, आम्ही तुमच्यासोबत आहोत,’ असा आधार देणे, तसेच संकटातून त्यांना उभे करण्यासाठी मदत करणे, हा खऱ्या अर्थाने करुणेचा अर्थ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले. आपल्यासारख्याच परिस्थितीत जगणाऱ्या आणि संघर्ष करणाऱ्या लोकांचा आदर ठेवून आपल्या वैचारिक भूमिकेवर ठाम राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वतःला बुद्ध आणि तथागतांच्या धम्माचे वारस मानणाऱ्या प्रत्येकाने सार्वजनिक तसेच खाजगी जीवनात करुणेचे तत्त्वज्ञान अंगीकारून ते आचरणात आणले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

स्त्री-अत्याचार, भ्रूणहत्या, धार्मिक किंवा वांशिक दंगली तसेच कुठेही होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या घटनांमध्ये संवेदनशीलतेने सहभागी होणे गरजेचे आहे. जिथे मानवी दुःख आणि अन्याय आहे, तिथे त्यांच्या संवेदनांमध्ये सहभागी होणे हाच खऱ्या अर्थाने करुणेचा अर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.

‘शिक्षण हा तिसरा डोळा’

प्रज्ञेचा अर्थ केवळ ज्ञान मिळवणे नसून प्रश्नांच्या मुळाशी जाणे आणि अन्यायामागील कारणांची मीमांसा करणे आहे, असे प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी स्पष्ट केले. ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचा आग्रह का धरला, याचा विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाला ‘तिसरा डोळा’ म्हटले होते. हा तिसरा डोळा म्हणजे ज्ञानप्राप्ती. शिक्षणामुळे माणूस विचार करू लागतो आणि आपल्या आजूबाजूच्या समाजाकडे डोळे उघडून पाहू लागतो. आपली परिस्थिती अशी का आहे, याचे विश्लेषण करण्याची क्षमता शिक्षणामुळे निर्माण होते, असे त्यांनी सांगितले.

मनुस्मृती दहनाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी समाजातील अन्याय आणि विषमतेच्या मुळांकडे लक्ष वेधले. धर्मांधता, चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि शोषणाच्या व्यवस्थेविरोधात त्यांनी वैचारिक संघर्ष उभा केला, असेही प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी नमूद केले.

‘निवडणुकीच्या वेळी विचार करण्याची शक्ती कुठे जाते?’

बाबासाहेबांना मानणारे लोक मोठ्या प्रमाणावर आंबेडकर जयंती आणि बुद्ध पौर्णिमा साजरी करतात; मात्र निवडणुकीच्या वेळी आपल्या वैचारिक भूमिकेचा विचार करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

संविधानाने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला असून, या अधिकाराचा वापर करताना सामाजिक आणि वैचारिक जाणीव असणे आवश्यक आहे. दलित, बहुजन, मुस्लिम, कष्टकरी, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजूर यांसारख्या विविध सामाजिक घटकांच्या मताच्या ताकदीचा विचार बाबासाहेबांच्या सामाजिक न्यायाच्या व्यापक भूमिकेच्या संदर्भात केला पाहिजे, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

बाबासाहेब, फुले आणि बुद्ध यांच्या विचारांचा केवळ जयघोष करण्यापेक्षा ते सार्वजनिक आणि वैयक्तिक जीवनात आचरणात आणणे अधिक महत्त्वाचे आहे. हे विचार समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवून वैचारिक जाणीव निर्माण करणे ही उपस्थित प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.


       
Tags: AkolaAnjali AmbedkarAnjali Tai AmbedkarMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aghadi
Previous Post

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !

Next Post

शैक्षणिक संस्था की संस्थात्मक कत्तलखाने ?

Next Post
शैक्षणिक संस्था की संस्थात्मक कत्तलखाने ?

शैक्षणिक संस्था की संस्थात्मक कत्तलखाने ?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!
बातमी

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

by mosami kewat
October 3, 2026
0

पुणे : वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश कमिटी आणि ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक आज पुणे येथे पार पडली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष...

Read moreDetails
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026
तरुणांचा राग रस्त्यावर का?

तरुणांचा राग रस्त्यावर का?

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home