Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचा निषेध; २३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी होण्याचे सुजात आंबेडकर यांचे आवाहन

mosami kewat by mosami kewat
July 22, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचा निषेध; २३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी होण्याचे सुजात आंबेडकर यांचे आवाहन
       
मुंबई : दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचा तीव्र निषेध करत, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी २३ जुलै रोजी जाहीर करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सर्व समाजघटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया एक्स (X) खात्यावर यासंदर्भात पोस्ट केली आहे.

सुजात आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सरकारकडून झालेला अमानुष हल्ला हा प्रत्येक नागरिकाला शरमेने मान खाली घालायला लावणारा आहे. आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांवर अश्रुधुराचा आणि लाठीमाराचा वापर करण्यात आला, ही केंद्र सरकारच्या हुकूमशाही वृत्तीची झलक आहे.”

या घटनेच्या निषेधार्थ आणि आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी वंचित बहुजन आघाडीने २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, या बंदमध्ये सर्व समविचारी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना, सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

“हा लढा केवळ एखाद्या पक्षाचा किंवा संघटनेचा नसून देशाच्या भविष्यासाठीचा आहे,” असेही सुजात आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Tags: Jantar MantarJantar Mantar ProtestMaharashtraMaharashtra Bandh 23 JulyNEET UG examNew DelhiPoliticalSujat AmbedkarVanchit Bahujan Aghadi
Previous Post

सोशल मीडियाच्या पलीकडचा संघर्ष: देशातील तरुण रस्त्यावर उतरतो तेव्हा…

Next Post

दिल्ली में छात्रों पर अत्याचार के विरोध में 23 जुलाई को महाराष्ट्र बंद : एड. प्रकाश आंबेडकर

Next Post
दिल्ली में छात्रों पर अत्याचार के विरोध में 23 जुलाई को महाराष्ट्र बंद : एड. प्रकाश आंबेडकर

दिल्ली में छात्रों पर अत्याचार के विरोध में 23 जुलाई को महाराष्ट्र बंद : एड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home