Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

शिवसेनेच्या पक्ष व चिन्ह वादात भाजपचाच राजकीय फायदा; धनुष्यबाण चिन्ह हे गोठवले जाईल ― ॲड. प्रकाश आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
August 20, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
शिवसेनेच्या पक्ष व चिन्ह वादात भाजपचाच राजकीय फायदा; धनुष्यबाण चिन्ह हे गोठवले जाईल ― ॲड. प्रकाश आंबेडकर

शिवसेनेच्या पक्ष व चिन्ह वादात भाजपचाच राजकीय फायदा; धनुष्यबाण चिन्ह हे गोठवले जाईल ― ॲड. प्रकाश आंबेडकर

अकोला : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षाच्या सुरू असलेल्या सुनावणीवरून असं दिसतंय की, आधी दक्षता न घेतल्यामुळे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना दिलेले ‘धनुष्यबाण’ या चिन्हांवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला. आताची अवस्था पाहिली तर या लढाईत फायदा कोणाला? तर भाजपला याचा फायदा होईल.

तो म्हणजे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह कोर्टाकडून गोठवले जाईल. त्यामुळे दोन्ही शिवसेनेला एकमेकांच्या विरोधात लढावे लागेल. धनुष्यबाण हे चिन्ह नसल्यामुळे दोन्ही शिवसेनेकडे असलेले आमदार, खासदार हे त्यांच्याकडे टिकतील का? हा मोठा प्रश्न आहे.याचा फायदा अमित शाह, भाजप घेईल. चिन्ह गोठल्यानंतर हे आमदार, खासदार भाजपाकडे पळतील. कोर्टाचा निर्णय कोणाच्याही बाजूने लागला तरी फायदा भाजपचा आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. (Prakash Ambedkar)

अकोला येथील यशवंत भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना पक्ष व चिन्ह विवाद, निवडणूक आयोग आणि न्यायालयाचे अधिकार क्षेत्र तसेच मराठा व ओबीसी आंदोलनावर आपली भूमिका स्पष्ट केली. ॲड. आंबेडकर यांनी म्हटले की, मध्यंतरी भाजपने पक्ष फोडाफोडी सुरू केली होती, ती जंतरमंतर वरील आंदोलनामुळे त्याला आळा बसला होता. कोर्टाचा निर्णय आल्यानंतर आमदार, खासदारांची फोडाफोडी मोठ्या प्रमाणात दिसेल.

कायदेशीर मुद्द्यांवर प्रकाश टाकताना ॲड. आंबेडकरांनी सांगितले की, राजकीय पक्षांच्या वादात मूळ कायदेशीर क्षेत्राचा प्रश्न डावलला जात आहे. सादिक अली खटल्याच्या वेळी राजकीय पक्षांची नोंदणी सक्तीची नव्हती आणि ते केवळ एक असोसिएशन म्हणून कार्यरत होते, त्यामुळे निवडणूक आयोगाला निर्णय देण्याचा अधिकार होता. मात्र, १९८९ मध्ये लोकप्रतिनिधी कायद्यात दुरुस्ती करून कलम २९ (अ) समाविष्ट करण्यात आले, ज्यामुळे राजकीय पक्षांचे कायदेशीर अस्तित्व निर्माण झाले. नागरी न्यायालयांचे अधिकार क्षेत्र कायद्याने काढून घेतलेले नसताना, राजकीय पक्षांमधील अंतर्गत भांडणे सोडवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नसून नागरी न्यायालयांनाच आहे. निवडणूक आयोगाला नागरी अधिकार क्षेत्र नसतानाही अशा प्रकारे निर्णय दिले जाणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही. (Prakash Ambedkar)

दुसऱ्या बाजूला, मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर बोलताना त्यांनी नमूद केले की, जरांगेंनी आंदोलनाच्या माध्यमातून आपली ताकद दाखवून दिली असली, तरी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनीही प्रति आव्हानाची भूमिका घेत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. छगन भुजबळ आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत घडलेल्या घटनांनंतर आता संपूर्ण ओबीसी समाज आणि सर्व ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात का? हा मोठा प्रश्न आहे. आगामी काळात ओबीसी मतांचे महत्त्व लक्षात घेता जरांगेंना पूर्वी पाठिंबा देणारे घटक त्याच ताकदीने सोबत राहतील का, यावरच मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरेल आणि याबाबतचा अंतिम निर्णय जनता व मतदारच करतील.

Tags: AkolabjpCongressHigh CourtMaharashtraManoj JarangeMohan BhagwatmumbaiPrakash AmbedkarrssShivsena
Previous Post

“मनरेगा”च्या नव्या अवताराने “व्हीबी-रामजी”ने पहिल्याच महिन्यात रंग दाखवायला सुरुवात

Next Post

मच्छरांपासून यवतमाळकरांना वाचविण्यासाठी नगरपरिषद अपयशी; वंचित बहुजन आघाडीतर्फे नगरपरिषदेतच धुरफवारणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा
बातमी

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

by mosami kewat
September 29, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित करण्यात आलेल्या इराण...

Read moreDetails
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

September 29, 2026
मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

September 29, 2026
शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 29, 2026
रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

September 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home