Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अतिक्रमण कारवाईवरून शेवगावात राजकीय गदारोळ; नगर परिषदेच्या पक्षपाती कारवाईवर प्रा. किसन चव्हाण आक्रमक

mosami kewat by mosami kewat
August 20, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
अतिक्रमण कारवाईवरून शेवगावात राजकीय गदारोळ; नगर परिषदेच्या पक्षपाती कारवाईवर प्रा. किसन चव्हाण आक्रमक
       
अहमदनगर : शेवगाव शहरातील अतिक्रमण कारवाईमध्ये प्रशासनाकडून भेदभाव केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य प्रा. किसन चव्हाण यांनी बुधवारी (दि. १९) सायंकाळी पत्रकार घेतली. आणि यावेळी पत्रकार परिषदेत शेवगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे तसेच शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांचा निषेध व्यक्त केला.

पत्रकार परिषदेत प्रा. चव्हाण यांनी आमदार मोनिका राजळे यांच्यावर टीका करताना, गोरगरिबांच्या अतिक्रमणांवर कारवाई केली जात असताना ती थांबविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे ठाम भूमिका घेतली नाही. मात्र, धनदांडग्यांच्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याची वेळ आली असता त्यांच्या बैठका घेऊन मुख्याधिकाऱ्यांना बोलावण्यात येते आणि कारवाई शक्य तितकी लांबणीवर कशी टाकता येईल, यासाठी त्या अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांचीही भेट घेऊन आले, अतिक्रमणे न काढावे यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप केला.

अतिक्रमण कारवाईमध्ये सर्वांसाठी समान निकष असावेत, अशी मागणी करत प्रा. चव्हाण म्हणाले की, या प्रकरणी येत्या काही दिवसांत अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची भेट घेऊन त्यांच्याकडे वस्तुस्थिती मांडण्यात येईल आणि प्रशासनाला जाब विचारण्यात येईल. त्यानंतरही योग्य कारवाई न झाल्यास अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानासमोर अतिक्रमणधारकांचे बिऱ्हाड घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

तसेच, या सर्व प्रयत्नांनंतरही संबंधित अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात आली नाही, तर छत्रपती संभाजीनगर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल करण्यात येईल, असेही प्रा. चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

Tags: ahmadnagarKisan ChavhanShevgaonVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

बार्टीच्या पीएच.डी. अधिछात्रवृत्तीतील वयोमर्यादेचा प्रश्न वंचितने आणला ऐरणीवर; बार्टीच्या महासंचालकांच्या मान्यतेने शासनाला पत्र; संशोधक विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा

Next Post

माता रमाई आंबेडकर नगर वसतिगृहातील समस्यांवर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी
बातमी

हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी

by mosami kewat
September 7, 2026
0

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील शासकीय व निमशासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध आहेत का, याची पाहणी...

Read moreDetails
मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

September 7, 2026
सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

September 7, 2026
विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

September 7, 2026
तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा 'Gen-Z' कनेक्ट

तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा ‘Gen-Z’ कनेक्ट

September 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home