Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

माता रमाई आंबेडकर नगर वसतिगृहातील समस्यांवर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी

mosami kewat by mosami kewat
August 20, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
माता रमाई आंबेडकर नगर वसतिगृहातील समस्यांवर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी
       
मुंबई : चेंबूर येथील माता रमाई आंबेडकर नगर वसतिगृहातील विद्यार्थिनींना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत वंचित बहुजन आघाडीकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी यांनी पदाधिकाऱ्यांसह वसतिगृहाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

यावेळी स्नेहल सोहनी आणि पदाधिकाऱ्यांनी वसतिगृहातील विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व विविध समस्यांची माहिती जाणून घेतली. तसेच वसतिगृहातील उपलब्ध सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता तसेच विद्यार्थिनींना मिळणाऱ्या इतर मूलभूत सोयी-सुविधांची पाहणी करण्यात आली.

Also Read : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला उच्च न्यायालयाकडून जामीन; जन्मठेपेलाही स्थगिती

विद्यार्थिनींनी यावेळी मांडलेल्या विविध समस्या व अडचणींची वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली. या समस्यांबाबत संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करून विद्यार्थिनींना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि प्रलंबित प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगण्यात आले. या पाहणीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: MaharashtraMata Ramai ambedkar hostelPoliticalSnehal SohaniVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

अतिक्रमण कारवाईवरून शेवगावात राजकीय गदारोळ; नगर परिषदेच्या पक्षपाती कारवाईवर प्रा. किसन चव्हाण आक्रमक

Next Post

“मनरेगा”च्या नव्या अवताराने “व्हीबी-रामजी”ने पहिल्याच महिन्यात रंग दाखवायला सुरुवात

Next Post
“मनरेगा”च्या नव्या अवताराने “व्हीबी-रामजी”ने पहिल्याच महिन्यात रंग दाखवायला सुरुवात

“मनरेगा”च्या नव्या अवताराने “व्हीबी-रामजी”ने पहिल्याच महिन्यात रंग दाखवायला सुरुवात

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी
बातमी

हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी

by mosami kewat
September 7, 2026
0

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील शासकीय व निमशासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध आहेत का, याची पाहणी...

Read moreDetails
मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

September 7, 2026
सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

September 7, 2026
विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

September 7, 2026
तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा 'Gen-Z' कनेक्ट

तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा ‘Gen-Z’ कनेक्ट

September 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home