Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बार्टीच्या पीएच.डी. अधिछात्रवृत्तीतील वयोमर्यादेचा प्रश्न वंचितने आणला ऐरणीवर; बार्टीच्या महासंचालकांच्या मान्यतेने शासनाला पत्र; संशोधक विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा

mosami kewat by mosami kewat
August 19, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
बार्टीच्या पीएच.डी. अधिछात्रवृत्तीतील वयोमर्यादेचा प्रश्न वंचितने आणला ऐरणीवर; बार्टीच्या महासंचालकांच्या मान्यतेने शासनाला पत्र; संशोधक विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा
       

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने  पीएच.डी. अधिछात्रवृत्ती योजनेतील ३० वर्षे वयोमर्यादा लादण्याचा प्रश्न वंचितने ऐरणीवर आणला असून अधिछात्रवृत्ती योजनेतील ३० वर्षांची वयोमर्यादा रद्द करावी, या मागणीसाठी बार्टीच्या महासंचालकांच्या मान्यतेने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या प्रधान सचिवांकडे अधिकृत पत्र सादर करण्यात आले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी  बार्टीच्या पीएच.डी. अधिछात्रवृत्ती योजनेतील वयोमर्यादेची अट रद्द करण्याबाबत १८ ऑगस्ट २०२६ रोजी शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.

त्यानुसार पीएच.डी. अधिछात्रवृत्ती योजनेतील ३० वर्षांची वयोमर्यादा तात्काळ रद्द करण्यात यावी आणि संशोधनासाठी कोणतीही उच्च वयोमर्यादा लागू करण्यात येऊ नये, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर उशिरा संशोधनाकडे वळतात. काही विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आर्थिक अडचणींमुळे खंड पडतो.त्यामुळे केवळ वयाच्या निकषामुळे पात्र आणि गुणवंत विद्यार्थ्यांना संशोधनाच्या संधीपासून वंचित ठेवणे अन्यायकारक ठरू शकते.संशोधनाची गुणवत्ता, विद्यार्थ्याची शैक्षणिक पात्रता आणि संशोधनाची क्षमता यांना प्राधान्य देणे आवश्यक असून, केवळ वयाच्या आधारे संशोधनाची संधी नाकारू नये, अशी भूमिका वंचितने मांडली.

बार्टीच्या अधिकृत पत्रामध्ये संबंधित शासन निर्णय, वित्त विभागाच्या सूचना तसेच अधिछात्रवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीबाबतच्या प्रक्रियेचा संदर्भ देण्यात आला आहे. पीएच.डी. अधिछात्रवृत्तीसाठी मार्गदर्शक सूचना, जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचेही पत्रात नमूद आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनाद्वारे वयोमर्यादेच्या अटीमुळे पात्र संशोधक विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला आहे. बार्टीने हे निवेदन शासनाला सादर करण्यात आले आहे.

सोबतचे अधिछात्रवृत्तीच्या संख्येत वाढ करण्याचीही मागणी वंचितने केली आहे.पीएच.डी. अधिछात्रवृत्तीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे केवळ वयोमर्यादा रद्द करण्याबरोबरच अधिछात्रवृत्तीच्या संख्येतही आवश्यक वाढ करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

वंचितने केल्या विद्यार्थी हिताच्या मागण्या..

१. पीएच.डी. अधिछात्रवृत्तीतील ३० वर्षांची वयोमर्यादा तात्काळ रद्द करावी.

२. संशोधनासाठी कोणतीही उच्च वयोमर्यादा लागू करू नये.

३. वयोमर्यादेमुळे योजनेपासून वंचित राहिलेल्या पात्र विद्यार्थ्यांना विशेष संधी द्यावी.

४. पीएच.डी. अधिछात्रवृत्तीच्या संख्येत आवश्यक ती वाढ करावी.

५. योजनेतील नियम व निकष निश्चित करताना विद्यार्थी, संशोधक आणि संबंधित सामाजिक संघटनांशी चर्चा करावी.

६. या विषयावर शासनाने तातडीने स्पष्ट आणि विद्यार्थीहिताचा निर्णय जाहीर करावा.

बार्टीच्या महासंचालकांच्या मान्यतेने शासनाकडे अधिकृत पत्र सादर झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या या मागणीला महत्त्व प्राप्त झाले आहे.आता शासनाने ३० वर्षांची वयोमर्यादा रद्द करून संशोधक विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी विद्यार्थी आणि संशोधकांकडून होत आहे.


       
Tags: BARTI PhD FellowshipMaharashtrapuneVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

कुर्ला एल विभागातील नागरी समस्यांवर स्वप्नील जवळगेकर यांची प्रभारी सहाय्यक आयुक्तांशी भेट

Next Post

अतिक्रमण कारवाईवरून शेवगावात राजकीय गदारोळ; नगर परिषदेच्या पक्षपाती कारवाईवर प्रा. किसन चव्हाण आक्रमक

Next Post
अतिक्रमण कारवाईवरून शेवगावात राजकीय गदारोळ; नगर परिषदेच्या पक्षपाती कारवाईवर प्रा. किसन चव्हाण आक्रमक

अतिक्रमण कारवाईवरून शेवगावात राजकीय गदारोळ; नगर परिषदेच्या पक्षपाती कारवाईवर प्रा. किसन चव्हाण आक्रमक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा
बातमी

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

by mosami kewat
September 29, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित करण्यात आलेल्या इराण...

Read moreDetails
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

September 29, 2026
मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

September 29, 2026
शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 29, 2026
रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

September 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home